आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक टि्वट पडले महागात, भाजपने नेहा धूपियाच्या घराबाहेर केले प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रदर्शन करताना भाजप कार्यकर्ते, इन्सेटमध्ये नेहा धूपिया)

मुंबई-
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाने मोदी सरकारच्या विरोधात एक टि्वट केले होते. त्या एका टि्वटमुळे नेहाला विरोधाचा सामना करावा लागत आहे. टि्वटनंतर सोशल मीडियावर तिच्यावर टिका होत आहे. शनिवारी (25 जुलै) भाजप कार्यकर्त्यांनी तिच्या घराबाहेर अंदोलन केले.
मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर बिघडलेल्या परिस्थितीवर नेहाने 21 जुलैला रोजी टि्वट करून लिहिले, 'एक पाऊस आणि शहर थांबले. चांगल्या सरकारचा अर्थात सेल्फी काढणे आणि आम्हाला योगा शिकवणे नव्हे. याचा अर्थ असा, की याची खात्री करा आपले नागरिक सुरक्षित आहेत की नाही.'
नरेंद्र मोदी यांच्याव्दारे प्रमोट केलेल्या 'सेल्फी विथ डॉटर' अभिनयानंतर श्रुती सेठनेसुध्दा पीएम मोदी यांच्यावर टि्वटरवर टिका केली होती. त्यानंतर अनेक यूझर्सने तिच्यावर अनेक आक्षेपार्ह टिका केल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेहाच्या घराबाहेर प्रदर्शन करताना भाजपचे कार्यकर्ते...