आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BMC Notice To Anil Kapoor, Juhi Chawla And Jeetendra

अनिल कपूर, जुही चावलाच्या घरी आढळले डेंग्यूचे उत्पत्ती स्थान, BMC ने पाठवली नोटिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, जितेंद्र आणि अभिनेत्री जुहू चावला या सेलिब्रटींना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. आलिशान जुहू आणि मलबार हिल परिसरात राहणाऱ्या या सेलिब्रिटींच्या घरी डेंग्यूचे उत्पत्ती स्थान आढळून आल्याने त्यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
अनिल कपूर यांच्या बंगल्यात रेन शेडमध्ये, जुही चावलाच्या ऑर्नामेंट पॉटसमध्ये, जितेंद्र यांच्या घरातील कृत्रिम कारंजामध्ये डेंग्यूचे डास आढळले आहेत. दिवंगत गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारच्या घरीही डेंग्यूचे उत्पत्ती स्थान आढळून आले आहे. या सर्व सेलिब्रिटींना एस्ट्रिंजेंट सेक्शन 381 (बी) अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे.
या सेलिब्रिटींच्या घरीही पोहोचले चौकशी पथक
अभिनेते अमिताभ बच्चन, रणजित, शिल्पा शेट्टी, संजय खान यांच्याही घरांची तपासणी करण्यात आली. मात्र, तिथे डेंग्यूची उत्पत्ती आढळली नाही.
मुंबईतील डेंग्यूची परिस्थिती?
ऐन सणासुदीच्या काळात मुंबईत डेंग्यूचे अडीच हजार रुग्ण आढळले असून त्यात तीन जणांचा मृत्युही झाल्याचे समोर आले आहे. वेळीच डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत डेंग्यूचा फैलाव होऊ नये आणि डासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना डास प्रतिबंधक मलम लावून बाहेर फिरण्याचा सल्ला महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना दिला आहे. गेल्यावर्षी मुंबईत डेंग्यूचे 861 रुग्ण आढळले होते. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला होता.