आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी डार्लिंगने असा साजरा केला करवा चौथ, समोर आले खासगी PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळः ''हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. लग्नानंतर मी नवीन शहरात माझ्या प्रेमळ कुटुंबासोबत माझा पहिला करवा चौथ साजरा केला. मी स्वतःला खूप नशीबवान समजत आहे.'' हे म्हणतेय अभिनेत्री बॉबी डार्लिंग शर्मा. बुधवारी भोपाळमध्ये तिने तिच्या सासरी उत्साहात करवा चौथचे सेलिब्रेशन केले आणि त्याची छायाचित्रे divyamarathi.com सोबत शेअर केली.

सासूने दिले होते शॉपिंगसाठी पैसे
बॉबी सांगते, ''माझ्या सासूबाईंनी करवा चौथपूर्वी आशीर्वाद म्हणून पैसे दिले होते. या पैशांतून मी हेवी अॅम्ब्रॉडयरी सूट, पैंजण, बिछवे, झुमके आणि सौभाग्याच्या गोष्टी खरेदी केला. या निमित्ताने नववधूच्या रुपात मला नटायचे होते. शॉपिंग करताना प्रत्येक गोष्ट मी सासूबाईंना आवडेल अशीच खरेदी केली. त्यांच्या सांगण्यावरुन मी एक गोल्ड पेंडेंटसुद्धा खरेदी केले.''

माझ्या मुलीसारखी आहे माझी सून...
बॉबीच्या सासूबाई म्हणतात, ''बॉबी खूप स्वीट आहे. रमणीक ऑफिसला गेल्यानंतर बॉबी तिचा सगळा वेळ घर सजवण्यात घालवते. इतकेच नाही, तर बॉबीला स्वयंपाकाची आवड आहे. ती खूप चांगले जेवण बनवते. बॉबी मला माझ्या मुलीसारखी आहे.''

दिवाळीनंतर सर्वप्रथम जाणार वैष्णव देवीच्या दर्शनाला...
बॉबीचा नवरा रमणीकने सांगितले, ''कामात बिझी असल्याने आमचा हनीमून सतत रद्द होतोय. आम्ही दिवाळीनंतर माताच्या दर्शनासाठी वैष्णव देवीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानतंर काश्मीरमध्ये आम्ही आमचा हनीमून साजरा करणार आहोत.''

15 वर्षांनी लहान रमणीकसोबत बॉबीने केले लग्न...
लिंग परिवर्तन केल्यानंतर चर्चेत आलेल्या बॉबी डार्लिंगने भोपाळस्थित बिझनेसमन रमणीकसोबत याचवर्षी लग्न केले. रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेल्या बॉबी डार्लिंग (43)ने तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी लहान असलेल्या रमणीक (28) सोबत लग्न केले आहे. याचवर्षी 8 फेब्रुवारी रोजी गुपचुप पद्धतीने भोपाळस्थित एमपीनगरच्या गायत्री मंदिरात दोघांचे लग्न झाले. लग्नात फक्त दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. पंकज शर्माहून पाखी शर्मा झालेल्या बॉबी डार्लिंगने 2010 मध्ये ब्रेस्ट सर्जरी करुन जेंडर चेंज केले होते.

अमित शर्मासोबत होते अफेअर
बॉबी डार्लिंगचे बॉलिवूडमधील अनेक जणांसोबत अफेर होते. रमणीकपूर्वी अभिनेता अमित शर्मासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. बॉबी डार्लिंगच्या मते, तिला रमणीकच्या रुपात खरा जोडीदार गवसला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, करवा चौथला क्लिक झालेली बॉबी डार्लिंगची तिच्या नव-यासोबतची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...