Home »News» Bobby Darling Launch Justice For Bobby Darling Campaign On Facebook

बॉबी डॉर्लिंगची सोशल मीडियावर मदतीसाठी हाक, लोकांना केले असे अपिल

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 10:38 AM IST

मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस बॉबी डार्लिंग उर्फ पाखी शर्माने नुकतीच तिचा पती रमणीक शर्माच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचार आणि अनैसर्गिक सेक्सचा हुन्हा दाखल केला आहे. पण आता बॉबीने न्यायासाठी सोशल मीडियावर हाक दिली आहे. बॉबीने 'जस्टिस फॉर बॉबी डार्लिंग' नावाने फेसबूक पेज बनवले आहे. त्यावर तिने लोकांकडे मदतीसाठी याचना केली आहे. लोकांनी तिच्या केसचा विसर पडू नये म्हणून असे केल्याचे बॉबीने म्हटले आहे.

फेसबूकवर केली अशी अपिल..
- बॉबीने फेसबूक पेजवर लिहिले, मित्रांनो प्लीज माझे पेज 'जस्टीस फॉर बॉबी डार्लिंग' ला जास्तीत जास्त लाइक करा. त्याचबरोबर माझ्या फेव्हरमध्ये कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेयर करा.
- मी माझ्या सर्व मित्र, फॅमिली मेंबर्स, फॅन्स, अपरिचित, मीडिया आणि एलजीबीटी कम्युनिटी मेंबर्सना रिक्वेस्ट करते की, मला न्याय मिळवून देण्यासाठई आणि सपोर्ट करण्यासाठी 'जस्टीस फॉर बॉबी डार्लिंग' या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा.
- बॉबीने म्हटले, तुम्ही सर्व माझी शक्ती आहात. मला माहिती आहे की तुमच्या प्रार्थनेने मला लवकरच न्याय मिळेल. सीएडब्ल्यू सेल, राणीबागने 12 सप्टेंबरला मला आणि माझ्या पतीला मिटींगसाठी बोलावले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, बॉबी डार्लिंगने रमणिकवर लावलेले आरोप...

Next Article

Recommended