आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bobby Deol Shares Muscular Look For Race 3 Inspired By Salman Khan, Fans Comment On Twitter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉबी देओलने \'रेस-3\' साठी अशी तयार केली बॉडी, फॅन्सने दिली अशी रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काही दिवसांपूर्वीच देओल बंधु 'पोस्टर बॉइज'मध्ये दिसले होते. बॉबी देओल बॉलिवूडमध्ये आणखी एका फिल्ममधून धमाकेदार एंट्री करणार आहे. यासाठी त्याने जोरदार तयारी सुरु केली आहे. रेमो डिसूजाची फिल्म 'रेस-3' मध्ये बॉबी देओल वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या फिल्ममध्ये सलमान खान देखील आहे. 

 

'रेस-3'मध्ये बॉबी देओलचा 'नेव्हर सीन बिफोर' अवतार... 
या फिल्मसाठी बॉबी देओलने त्याच्या बॉडीवर खूप मेहनत घेतली आहे. हे त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोतून दिसत आहे. बॉबी देओलने त्याचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यासोबत लिहिले आहे, की 'तुम्ही केलेली मेहनत जेव्हा फळाला आली हे दिसायला लागते तेव्हा विशेष आनंद होतो. थँक्यू सलमान खान तु दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.'

 


फॅन्सच्या अशा होत्या रिअॅक्शन
- बॉबी देओलने ट्विटरवर फोटो शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊसच पडला. 
- बॉबी देओलच्या फिट अँड स्लिक बॉडीचे त्याच्या फॅन्सने कौतूक केले. एका यूजरने लिहिले, 'फिल्मसाठी बेस्ट ऑफ लक पाजी. रेस-3 हिट राहाणार.'
- आणखी एका यूजरने लिहिले, 'उशिराने का होईना, शहाणपण आले. कीप इट अप.'
-  एका फॅनने बॉबीच्या नव्या अवताराचे  मनापासून कौतूक केले. त्याने लिहिले आहे, 'तुमचा हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट फोटो आणि लुक आहे. रेस-3साठी शुभेच्छा.'

बातम्या आणखी आहेत...