Home »News» Bobby Deol Shares Throwback Photo With Dharmendra

बॉबी देओलने शेअर केला धर्मेंद्र यांच्यासोबतचा Cute फोटो, आणि म्हणाला...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:20 PM IST

  • वडील धर्मेंद्र यांच्यासोबत चिमुकला बॉबी

अभिनेता बॉबी देओलने अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा वडिलांसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत लहानगा बॉबी वडील धर्मेंद्र यांच्यासोबत दिसतोय. विशेष म्हणजे फोटोत लहानगा बॉबी अतिशय क्यूट दिसतोय, तर धर्मेंद्र नेहमीप्रमाणेच हॅण्डसम दिसत आहेत. फोटो शेअर करुन बॉबीने कॅप्शन दिले, 'माझ्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षणांपैकी एक... माझ्या वडिलांचे माझ्यासोबत असणे.' बॉबी वडील धर्मेंद्र यांच्या अतिशय जवळचा असून हे दोघे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र झळकले आहेत.

यापूर्वीही बॉबीने शेअर केला आहे आईवडिलांसोबतचा फोटो...
बॉबीने यापूर्वी याच महिन्यात म्हणजे 2 ऑक्टोबर रोजीही एक जुना फोटो शेअर केला होता. यात तो वडील धर्मेंद्र आणि आई प्रकाश कौर यांच्यासोबत दिसतोय. बॉबीने हा फोटो ट्विटरवर शेअर करुन लिहिले, 'the Loves of my life so blessed to be their child'. बॉबीने शेअर केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धर्मेंद्र यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले, तर खासगी आयुष्यामुळेदेखील ते चर्चेत राहिले.
वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते धर्मेंद्र यांचे पहिले लग्न...
वयाच्या 19 व्या वर्षी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. या दाम्पत्याला दोन मुली आणि दोन मुले आहेत. सनी देओल, बॉबी देओल ही त्यांच्या मुलांची तर विजेता आणि अजीता ही त्यांच्या मुलींची नावे आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलला आणि त्यांनी लग्न केले. हेमा यांच्यासोबत लग्नाच्या वेळी धर्मेंद्र पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट देऊ इच्छित होते. पण प्रकाश कौर यासाठी तयार नव्हत्या.

...म्हणून धर्मेंद्र यांनी धर्म बदलून केले हेमासोबत लग्न...
धर्मेंद्र विवाहित होते, पण ड्रीमगर्लसाठी त्यांनी सर्व बंधने झुगारुन टाकली. त्यांनी धर्म परिवर्तन करुन हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले. हा तो काळ होता, जेव्हा त्यांची मुलगी लग्नाच्या वयात आली होती. तर मुलगा सनी देओल सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता. तरीदेखील धर्मेंद्र यांनी 2 मे 1980 रोजी हेमा यांच्यासोबत लग्न केले. जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न झाले, तेव्हा हेमा यांचे फिल्मी करिअर यशोशिखरावर होते. त्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. लग्नाच्यापूर्वीच हेमा आणि धर्मेंद्र यांनी 12 हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

बॉबी देओलचे फिल्मी करिअर ठरले फ्लॉप...
बॉबी देओलने 'बरसात' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्याचा हा पहिला चित्रपट हिट ठरला. पण पुढे मात्र त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. दीर्घ काळानंतर त्याचा 'पोस्टर बॉईज' हा चित्रपट रिलीज झाला, खरा पण हाही चित्रपट फ्लॉपच्या यादीत आला. एका मुलाखतीत बॉबी म्हणाला होता, 'मी गेल्या चार वर्षांत काहीच केले नाही. कदाचित मी अपिलिंग नव्हतो आणि मला हवी तशी भूमिकासुद्धा मिळाली नाही. हा काळ अतिशय निराशाजनक होता.' असे म्हटले जाते, की चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे बॉबी दारुच्या आहारी गेला होता. पण पत्नी तान्याने त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढले.

पुढील स्लाईड्सवर बघा, देओल फॅमिली मेंबर्सचे फोटोज...

Next Article

Recommended