आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारतात सेक्स एज्युकेशन गरजेचे कारण..' वाचा या अॅक्ट्रेसचे Bold Statement

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - भारतामध्ये सेक्स एज्युकेशन गरजेचे असल्याचे मत अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे याचे कारण सांगताना त्यांनी एक बिनधास्त आणि धक्कादायक स्टेटमेंटही केले आहे. 'भारतात सेक्स एज्युकेशन गरजेचे आहे, कारण येथील लोकांना ते लाखोंवरून कोट्यवधी कसे झाले हे समजलेच नाही.' असे वक्तव्य त्यांनी केले आहे. 

रत्ना पाठक शहा यांची भूमिका असलेला 'लिपस्टीक अंडर माय बुर्का' हा चित्रपट 21 जुलै रोजी रिलीज होतोय. त्यानिमित्ताने बोलताना रत्ना पाठक यांनी बिनधास्तपणे आपली मते मांडली. भारताची लोकसंख्या अब्जावधीवर कशी पोहोचली हेच लोकांना माहिती नाही. लोक देवाच्या कृपेने झाले असे सहजच म्हणतात. पण याबाबत माहिती होण्यासाठी सेक्स एज्युकेशन गरजेचे असल्याचे रत्ना पाठक यांनी सांगितले. त्यासाठीच अलंकृता यांनी 'लिपस्टीक अंडर माय बुर्का' हा चित्रपट बनवला असल्याचेही त्या म्हणाल्या. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाल्या रत्ना पाठक शहा..

 
बातम्या आणखी आहेत...