आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Akshay Kumar Detained At London Heathrow Airport

लंडनच्या एअरपोर्टवर अक्षयला घेतले होते ताब्यात, जाणून घ्या कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रूस्तम'च्या शूटिंगसाठी अक्षय लंडनला गेला आहे - Divya Marathi
'रूस्तम'च्या शूटिंगसाठी अक्षय लंडनला गेला आहे
मुंबई: अभिनेता अक्षय कुमारला लंडनच्या हीथ्रो एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे व्हीसा नव्हता, म्हणून बुधावारी (6 एप्रिल) पोलिसांनी त्याला जवळपास अडीच तास ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतर अक्षयला सोडून देण्यात आले.
शूटिंगसाठी लंडनला गेलाय अक्षय...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रुस्तम' सिनेमाच्या शूटिंगसाठी अक्षय पर्सनल ट्रेनरसोबत 15 दिवसांसाठी लंडनला गेला आहे.
- हीथ्रो एअरपोर्टवर अधिका-यांनी त्याला लंडनला येण्याचे कारण विचारल्यानंतर, त्याने सिनेमाचे शूटिंग सांगितले.
- अक्षयला अडीच तास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान तो एअरपोर्टवर प्रायव्हेट एरियामध्ये बसला होता.
प्रॉडक्शन हाऊसने दिला नकार...
- सिनेमाच्या प्रॉडक्शन हाऊसशी निगडीत एका व्यक्तीने या वृत्ताला 'बकवास' असल्याचे सांगितले आहे.
- ती व्यक्ती म्हणाली, कुणी विना व्हीसा लंडनपर्यंत कसा प्रवास करू शकतो.
- तुम्ही क्वीनचे मित्र असल्याचे सांगितले तरीदेखील तुमच्याकडे वैध व्हीसा नसेल तर घरी पाठवले जाते.
- मीडियामध्ये आलेले वृत्त आक्षेपार्ह आहेत. एअरपोर्टच्या अधिका-यांनी कागदपत्रे तपासण्यासाठी काही वेळ घेतला होता. कारण, त्यांचे कम्प्यूटर्स काम करत नव्हते आणि त्याचे व्हीसा स्टेट्स शो करत नव्हते.
- अक्षय लंडनला शूटसाठी गेला आहे आणि त्याच्याकडील सर्व कागदपत्रे वैध आहेत.
पुढे वाचा, कुठे अडचण आली?