आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: एका स्टुडंटने दिली होती खिलाडी अक्षयला मॉडेलिंगची ऑफर, पाहा Unseen Pics

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारसाठी बँकॉक येथील एका हॉटेलमधील शेफ ते बॉलिवूडचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. नव्वदच्या दशकात अॅक्शन हीरोच्या रुपात आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करणारा अक्षय आज आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय फिल्म इंडस्ट्रीत एक मल्टी टॅलेंटेड अभिनेत्याच्या रुपात ओळखला जातो.

अक्षयचा जन्म एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अमृतसह येथे झाला. त्याच्या बालपणीच त्याचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. मार्शल आर्ट्सची आवड असलेला अक्षय ट्रेनिंग घेण्यासाठी बँकॉक येथे गेला. मार्शल आर्टच्या ट्रेनिंगसह अक्षयने येथील एका हॉटेलमध्ये शेफची नोकरी केली. मुंबईत परतल्यानंतर त्याने मुलांना मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.
याचदरम्यान अक्षयला त्याच्या एका विद्यार्थ्याने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. तो विद्यार्थी स्वतः एक फोटोग्राफर होता. त्यानेच अक्षयला पहिली मॉडेलिंग असाइनमेंट दिली होती.

'सौगंध'द्वारे फिल्मी करिअरला सुरुवात...
1991 मध्ये रिलीज झालेल्या 'सौगंध' या सिनेमाद्वारे अक्षयने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्याचा हा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला होता. हीरोच्या रुपात अक्षयला खरी ओळख प्राप्त झाली ती 1992 मध्ये रिलीज झालेल्या 'खिलाडी' या सिनेमाद्वारे. मात्र 1993 हे वर्ष त्याच्यासाठी अयशस्वी ठरले. यावर्षी त्याचे जवळपास पाच सिनेमे रिलीज झाले. मात्र कोणताच सिनेमा आपली छाप सोडू शकला नाही. 1994 मध्ये अक्षयने ‘ये दिल्लगी’, ’मोहरा’ आणि ’मैं खिलाडी तू अनाडी’ हे एकामागून एक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आणि त्याचे करिअर रुळावर आले.

असा ठरला खिलाडी कुमार...
अक्षयने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात खिलाडी शीर्षक असलेले अनेक सिनेमे केले. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. खिलाडी (1992), मैं खिलाडी तू अनाडी (1994), सबसे बडा खिलाडी (1995), खिलाडियों का खिलाडी (1996), मिस्टर एंड मिसेज खिलाडी (1997), इंटरनेशनल खिलाडी (1999), खिलाडी 420 (2000), खिलाडी 786 (2012) हे अक्षयचे खिलाडी शीर्षक असलेले प्रमुख सिनेमे आहेत.

अफेअर्समुळे राहिला चर्चेत...
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अक्षयचे अनेक अभिनेत्रींसह अफेअर राहिले. यामध्ये रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. सर्वप्रथम पूजा बत्रा अक्षयच्या आयुष्यात आली. मात्र तिच्यासह ब्रेकअप झाल्यानंतर रवीना टंडनसह त्याचे सूत जुळले. बातम्यांनुसार, अक्षय आणि रवीनाचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र रवीनासह रिलेशनशिपमध्ये असूनदेखील शिल्पा शेट्टीसह त्याची जवळीक वाढली. याची कुणकुण रवीनाला लागल्यानंतर तिने अक्षयसोबतचे आपले नाते संपुष्टात आणले. शिल्पासह तो सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्याचकाळात अक्षय आणि ट्विंकलच्या अफेअरची माहिती शिल्पाला मिळाली आणि तिनेही त्याच्या आयुष्यातून काढता पाय घेतला.

ट्विंकलची केली जोडीदाराच्या रुपात निवड...
दोनदा साखरपुडा केल्यानंतर अखेर ट्विंकल खन्नासोबत अक्षयने लग्न केले. 17 जानेवारी 2001 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आरवचा जन्म सप्टेंबर 2002मध्ये तर मुलगी निताराचा जन्म 25 सप्टेंबर 2012 रोजी झाला.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा अक्षय कुमारच्या खासगी आयुष्याची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...