आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Emraan Hashmi\'s Duplicate Came In Serial Audition

भेटा इमरान हाश्मीच्या डुप्लिकेटला, ऑडिशन देण्यासाठी आला आणि अडकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- एखाद्या मालिकेचे ऑडिशन सुरु आहे आणि कुणी बॉलिवूड अभिनेता ऑडिशन देण्यासाठी आला तर अर्थातच सर्वजण गर्दी करतील, त्याच्या आजूबाजूला जमतील. असेच झाले वाराणसीच्या कँट स्थित एका हॉटेलमध्ये. तिथे इमरान हाश्मीची एंट्री होताच गर्दी ओसंडून वाहत होती. चाहते एक झलक मिळवण्यासाठी उत्सूक झाले होते. कुणी त्याला ऑटोग्राफ मागत होते, तर कुणी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची घडपड करत होते. परंतु अचानक चाहत्यांची उत्सूकता आणि दीवानगी थंड पडली. कारण त्यांना जेव्हा माहित झाले, की हा खराखुरा इमरान हाश्मी नव्हे त्याचा डुप्लिकेट युवराज आहे.
अभिनेता इमरान हाश्मी सध्या 'हमारी अधूरी कहानी'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवरसुध्दा चांगला बिझनेस करत आहे. चाहत्यांना वाटले, की इमरान येथे त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला आहे. परंतु काहीवेळाने या कहानीवरून पदडा उठला, तेव्हा चाहते नाराज झाले. मुंबईहून आलेला युवराज हूबेहूब इमरान हाश्मीसारखा दिसतो. त्याला पाहून अनेकांना इमरान असल्याचा भास होतो. यावेळीदेखील असेल काहीसे घडले.
ऑडिशन देण्यासाठी आला होता इमरान हाश्मीचा डुप्लिकेट-
युवराजने सांगितले, की त्याचा चेहरा इमरानशी मिळता-जुळता आहे. एवढेच नव्हे त्याचा शरीरयष्ठी आणि चालसुध्दा इमरानसारखीच आहे. म्हणून सर्वजण त्याला इमरान समजायला लागतात. त्याच्या सांगण्यानुसार, श्री गणेश फिल्म अँड टीव्ही एंटरटेन्मेंटच्या बॅनर खाली एका मालिकेसाठी ऑडिशन सुरु होते. तो मालिकेसाठी गेस्ट सेलिब्रिटी म्हणून ऑडिशन देण्यासाठी आला होता. तेव्हा काही स्पर्धकांनी इमरान हाश्मी आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आला असल्याची अफवा पसरवली. त्यामुळे त्याला गाडी घेऊन दुस-या रस्त्याने जावे लागले, गर्दी उसळल्यानंतर पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, फेसबुकवरसुध्दा युवराजला इमरान समजतात चाहते...