Home »News» Bollywood Actor Fahim Ajani Interview In Bhaskar

नारद मुनीच्या भूमिकेतून फेमस झाला हा अॅक्टर, नागपूरसोबत आहे खास नाते

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 18:25 PM IST

नागपूरः आजच्या काळात बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार अतिशय प्रोफेशनल आहेत, पूर्वीच्या काळात असे चित्र नव्हते. स्वतःला शिस्तबद्ध ठेवण्याचे कौशल्य आजच्या कलाकारांकडे आहे. बाल चित्रपटांना सब्सिडी मिळायला हवी. जेणेकरुन बालचित्रपट जास्तीत जास्त संख्येने तयार होऊ शकतील. हे म्हणणे आहे मास्टर राजू उर्फ फाहिम अजानी यांचे. रविवारी ते नागपूर भेटीवर आले होते. यावेळी त्यांनी दिव्यमराठीच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली.

- मास्टर राजू उर्फ फाहिम अजानी यांचे नागपूर शहरासोबत खास नाते आहे. नागपूरनजीकच्या हिंगण घाट येथे त्यांचे सासर आहे. चितचोर या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना 1976 साली सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मास्टर राजू यांना चितचोर, शर्त, परिचय, अमर प्रेम, अभिमान, किताब, अंखियों के झरोखे से, नालायक, खट्टा-मीठा या सिनेमांमधून प्रसिद्धी मिळाली. वयाच्या दुस-या वर्षापासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर 200 हून अधिक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

नागपूरला नेहमी येणे होत असल्याचे मास्टर राजू यांनी यावेळी सांगितले. वर्तमानातील फिल्म मेकिंग आणि कलाकारांच्या कामामुळे संतुष्ट असलेले राजू म्हणतात, की आजच्या काळातील कलाकारांमध्ये असलेले प्रोफेशनॅलिजम ही खूप चागंली बाब आहे. पण स्पेशल इफेक्ट आणि कॉम्प्युटराइज्डमुळे चित्रपटाचा आत्मा निघून गेला असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. फॅमिली ओरिएंटेंड कंटेट गायब झाला असून पूर्वी चित्रपट हे कुटुंबासाठी बनवले जात असे. आता तरुणांसाठी चित्रपट बनतात. हे चित्रपट पडद्यावर भव्य दिव्य दिसतात पण त्यात आत्मा नसतो. आता ऋषिकेश मुखर्जींच्या चित्रपटांसारखा विनोद बघायला मिळत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

बाल कलाकार असतानाच्या स्टारडमविषयी राजू म्हणाले, त्याकाळी मला स्टारडम म्हणजे काय हे समजत नसे. पण राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर जेव्हा सर्वजण माझा ऑटोग्राफ घेत होते, तेव्हा मिथून चक्रवर्ती यांनी माझे तोंडभरुन कौतुक केले होते. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला.

बाल चित्रपटांना आता स्थान नाही...
मास्टर राजू यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले, की आज प्रत्येक निर्मात्याला शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे आता कोण बाल चित्रपटांची निर्मिती करणार? त्यामुळे बालचित्रपटांसाठी सब्सिडी मिळायला हवी. बालचित्रपट आता बनत नाहीत, कारण प्रत्येकाला नफा कमवायचा आहे. मल्टिप्लेक्समधअये तिकीटांच्या किंमती जास्त असतात आणि प्रेक्षक कमी. त्यामुळे बालचित्रपट चालत नाहीत. पूर्वी प्रत्येक चित्रपटात एक तरी बालकलाकार असायचा. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे.
पुढे वाचा, नारद मुनीची भूमिका साकारली तर तीच भूमिका वारंवार मिळू लागली...

Next Article

Recommended