आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत बॅक बेंचर होता इरफान खान, इंग्रजी चांगली नसल्याने मिळत होती शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावंडांबरोबर इरफान खान. - Divya Marathi
भावंडांबरोबर इरफान खान.
जयपूर - इरफान खान सोमवारी त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहरात आलेला होता. यावेळी त्याने शिक्षणाशी संबंधित त्याच्या जीवनातील काही महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर दिला. इरफान म्हणाला, तसे पाहता मी काहीसा ढ विद्यार्थीच होतो. पण माझे गणित चांगले होते. मी सुरुवातीपासूनच बॅक बेंचर होतो. वर्गात नेहमी मागे बसून स्वप्ने पाहायचो. स्वतःशीच चर्चा करायचो. शालेय वातावरणाची मला नेहमीच भिती वाटायची आणि त्यामुळे पळून जावेसे वाटायचे. 

शाळेत मिळायची शिक्षा.. 
इरफानने सांगितले की, शिक्षणाबाबत आमच्या घरचे वातावरण फारच गंभीर होते. जयपूरमध्ये सुरुवातीचे शिक्षण घराच्या जवळ असलेल्या सरकारी शाळेत सुरू होते. पण आम्ही इंग्रजी शाळेत शिकावे अशी आमच्या आईची इच्छा होती. त्यामुळे आम्ही एका कॉनव्हेंट स्कूलमध्ये जावू लागलो. इंग्रजीशी कधीही फारशी जवळीक नव्हती. त्यामुळे भाषा समजायला आणि बोलायला फारच त्रास व्हायचा. आम्ही प्रथमच सर्वांना इंग्रजीत बोलताना पाहिले होते. इंग्रजीमध्ये बोलता येत नसल्याचे नेहमी शाळेत शिक्षा व्हायची. 

इरफान म्हणाला, एकदा शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण एवढा घाबरलेलो होतो की, त्याचा आनंदच लुटता आला नाही. भविष्यात काय बनेल याचा विचारच कधी केला नव्हता. एकदा स्क्रीनवर एका आर्टिस्टला पाहिले. ते मनात भरले. एक दिवस मित्रांबरोबर रवींद्र मंचला गेलो. त्याठिकाणी जाऊन थेट म्हटलो, मला रोल पाहिजे. एक तोही काळ होता, जेव्हा आम्ही लपून लपून एन्जॉय करण्यासाठी युनिव्हर्सिटीच्या मागच्या ढाब्यावर जायचो. मी लहानपणापासूनच खूप लाजाळू होतो. पण विद्रोही वृत्तीही माझ्यात कायम होती.

मुलांवरून पत्नीबरोबर व्हायचा वाद 
बायकोसोबत नेहमी मुलांवरून वाद व्हायचा. मुले शाळेत गेले नाही तर त्यांच्यावर दबाव आणायचा नाही असे माझे म्हणणे असायचे. ज्याठिकाणी शिकण्यावर आणि शिकवण्यावर भर दिला जाईल अशा शिक्षण पद्धतीवर मी कायम जोर दिला आहे. घोकंपट्टी मला कधीही आवडली नाही. आपल्या देशात मध्यमवर्गातील लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना असते. मुलांनी शिकून काही तरी बनावे असे सर्वांना वाटत असते. पण काय बनायला हवे हे कोणालाही माहिती नसते. मग चुकीच्या करिअरमध्ये संपूर्ण जीवन घालवतात. 

स्पर्धा करायाची तर चायनीज शिका 
हिंदी भाषेवरील विश्वास उडता कामा नये. शाळांमध्ये आज मुलांना इतर भाषांशी जोडले जात आहे ही चांगली बाब आहे. कारण ग्लोबल लँग्वेजची माहिती असणे आजच्या काळात अनिवार्य आहे. चायनीज शिका. कारण भविष्यात तुम्हालाच चीनबरोबर स्पर्धा करायची आहे. पण दुसरीकडे आम्ही अमेरिकेला राजकीय भाऊ बनवले आहे. हे लक्षात घ्यावे लागेल की, आज लोक मुलांना सरकारी शाळेत पाठवत नाही. कारण त्यांची अवस्था अजूनही वाईटच आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इरफान खानचे काही निवडक PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...