आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Anniversary : हा खास दिवस कुटुंबासोबतच घालवतात रजनीकांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सुपरस्टार रजनीकांत यांच्या लग्नाला 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 फेब्रुवारी 1981 रोजी त्यांनी लता रंगाचारी यांना आपली जीवनसंगिनी बनवले होते. रजनीकांत दरवर्षी आपल्या लग्नाचा वाढदिवस फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत साजरा करतात. 

रजनीकांत आणि लता यांना दोन मुली असून ऐश्वर्या आणि सौंदर्या ही त्यांची नावे आहेत. थोरली मुलगी सौंदर्याचे लग्न उद्योजक अश्विन राजकुमारसोबत तर धाकटी लेक ऐश्वर्याचे लग्न अभिनेता आणि गायक धनुषसोबत झाले आहे. आता मात्र त्यांची मुलगी सौंदर्याने नव-यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. 66 वर्षीय रजनीकांत यांनी हिंदी, तामिळ आणि तेलगूसह अनेक भाषांमध्ये जवळजवळ 100 सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.  

पुढील स्लाईड्समध्ये पाहा रजनीकांत, त्यांच्या पत्नी लता, मुली आणि जावयांची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...