आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Sanjay Dutt Turned Poet At Yervada Jail Pune

अभिनेता संजय दत्तची 'सलाखे'तून शेरोशायरी, तुरुंगात लिहिल्या 500 शायरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगताना अभिनेता संजय दत्तने इतर दोन कैदी मित्रांसोबत ५०० शायरींचे लिखाण केले आहे. यातील शंभर शायरी संजयच्या अाहेत. त्याचे लवकरच "सलाखे' नावाने पुस्तकही प्रकाशित करणार असल्याचे त्याने सांगितले.

येरवडा तुरुंगात कैदी क्रमांक १६६५६ अशी संजय दत्तची ओळख होती. शिक्षा भोगताना त्याने कागदी पिशव्या तयार करण्याबरोबरच आरजे आणि इतर भूमिकाही निभावल्या. यादरम्यान त्याला लिहिण्याचाही छंद जडला होता. तुरुंगातील कैदी झैशान कुरैशी आणि समीर हिंगळे यांच्यासोबत त्याने ५०० शायरी लिहिल्या.

या सर्व शायरी िहंदीत आहेत. हे लिखाण आम्ही काही प्रकाशकांना दाखवले असून त्यांनीही पुस्तक प्रकाशनास सहमती दर्शवली आहे. तुरुंगात असताना पत्नी मान्यता मला भेटायला यायची. त्यावेळी मला अतिशय वाईट वाटायचे. मात्र, तिच्याकडे पाहून आनंदही वाटायचा. यातूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्याने सांगितले. तुरुंगातून परतल्यानंतर काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. त्यानंतर माझ्याकडे असलेल्या प्रलंबित चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. संजयच्या जीवनावर राजकुमार हिराणी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यात रणबीर कपूर संजयची भूमिका करणार आहे. तसेच मुन्नाभाई सिरीजच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी संजयने सिद्धार्थ आनंदचा चित्रपट साईन केला होता. हा चित्रपट दोन महिन्यांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.