आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Shahid Kapoor Marry Mira Rajput Today Chocolate Bars For The Wedding Guests

#ShahidKiShaadi मीरासोबत घेतले सात फेरे, बघा शानदार सोहळ्याचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्यादान करताना मीराचे वडील - Divya Marathi
कन्यादान करताना मीराचे वडील
नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत आज (मंगळवार) विवाहाच्या बंधनात अडकले. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त 40 पाहुण्यांच्या उपस्थितीत शाहिद आणि मीराचा विवाह मुहूर्तावर थाटात पार पडला. सकाळी अकरा वाजेचा विवाह मुहूर्त होता. छतरपूर येथील एका फार्महाऊसमध्ये विवाहाचे सर्व विधी आटोपले. वर्‍हाडींसाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये 50 रुम बुक करण्यात आल्या आहेत.

शाहिद आणि मीरा यांचे वेडिंग रिसेप्शन गुडगावमधील हॉटेल ओबेरॉयमध्ये होणार आहे. यात दोघांच्या फॅमिली मेंबर्ससह मित्रमंडळी सहभागी होणार आहे. त्याचप्रमाणे 12 जुलैला मुंबईत ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे. त्यात फेमस बॉलिवुड सेलेब्स उपस्थित राहाण्‍याची शक्यता आहे.
ब्रेकअप नंतर मीराशी जुळले...
करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद कपूरचे दिल्लीच्या मीराशी प्रेमसंबंध जुळले. काही महिने दोघांनी याबाबत मौन बाळगले होते. मात्र, नंतर शाहिदनेच आपण लवकरच विवाह करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दिल्लीत मंगळवारी हा विवाह सोहळा रंगणार आहे. शाहिदच्या विवाहाला कुटुंबीयांसह मित्र व बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार आहे

प्रेसिडेंशियल रूममध्ये थांबेल शाहिद
शाहिद कपूर हॉटेल ओबेरॉयच्या प्रेसिडेंशियल सुईटमध्ये थांबणार आहे. दोन बेडरूम असलेला हा सुईटची सजावट ऑरिजनल मॉर्डन आर्ट आणि इटालियन मार्बल्सने करण्‍यात आली आहे. सुईटमध्ये फायरप्लेस, डायनिंग रूम, स्टडी रूम, पँट्री, जिम कम योगा रूम, आऊटडोर पुल आदी सुविधा आहेत. या सुईटचे एका रात्रीचे भाडे सहा लाख रूपये आहे.

करिना कपूरला दिले निमंत्रण
मीराने बॉलीवूडमधील दिग्गजांची भेट घ्यावी यासाठी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. रिसेप्शनच्या पाहुण्यांमध्ये शाहिदची पूर्व प्रेयसी करिना कपूरच्या नावाचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, विद्या बालन, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा आणि बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना रिसेप्शनचे आमंत्रण देण्यात आले आहे.

फॅमिली मेंबर्स पोहोचले...
शाहिद आणि मीराचे फॅमिली मेंबर्स दिल्लीत पोहोचले आहेत. शाहिद टीव्ही शो 'झलक दिखला जा'चे शूटिंग करून सरळ गुड़गावला पोहोचणार आहे. शाहिद 'झलक दिखला जा'चा जज आहे. त्यामुळे रिसेप्शन झाल्यानंतर तो पुन्हा सेटवर परत येणार आहे.
शाहिदचे वडील पंकज कपूर आणि आई सुप्रिया पाठक गुडगावमध्ये पोहोचले आहेत. सुप्रिया पाठक ही शाहिदची दुसरी आई आहे. शाहिद हा पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. नीलिमा आणि पंकज यांनी दिल्लीतील मीरा राजपूतशी शाहिदचा विवाह निश्चित केला होता. मीरा 34 वर्षाची असून शाहिद पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

वर्‍हाडींसाठी पर्सनलाइज्ड चॉकलेट्स बार
शाहिद आणि मीराच्या विवाहाला येणार्‍या खास वर्‍हाडींसाठी पर्सनलाइज्ड चॉकलेट्स बार तयार करण्‍यात आला आहे. 'स्मिटन बेकरी'ने विविध फ्लेअरमध्ये हा बार तयार केला आहे. स्मिटन बेकरीने या चॉकलेट बारचे फोटो 'इंस्टाग्राम'वरही शेअर केले आहेत.

स्वागतासाठी 15 प्रकारची जयपुरी पाने
विवाहाला येणा-या पाहुण्यांचे जयपुरी पान देऊन स्वागत करण्यात येणार आहे. यात विविध प्रकारची 15 जयपुरी पाने आणि सोबत खास भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. पानाच्या प्रकारांत खजूर पान, ड्रायफ्रूट पान, गुलाब आणि आंब्याचा स्वाद असलेल्या पानासह चॉकलेट पानही ठेवण्यात येणार आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांची पसंती असलेल्या अनू मोबाइल पान भांडारला पान बनवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संगीत सेरेमनीमध्ये मीरा संग डान्स करताना शाहिद. पाहा व्हिडिओ आणि शानदार सोहळ्याचे फोटो...