आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

54व्या वर्षी शेखर सुमनने केले ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले 6 पॅक्स अॅब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
54 वर्षांचा अॅक्टर आणि होस्ट शेखर सुमन सध्या आपल्या फिटनेसवर लक्ष्य देत आहे. त्याने स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले असून आता तो 6 पॅक अॅब्स असलेला तरुण दिसतो. जिममध्ये बायसेप्स तयार करतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो जिमध्ये व्यायाम करताना दिसतो. शेखरचा हा फोटो त्याचा मुलगा अध्ययन सुमन याने क्लिक केला आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंवर कव्हर फोटो म्हणून लावला आहे. 
 
बऱ्याच वर्षानंतर भूमी चित्रपटात दिसला... 
- दोन महिन्यांपूर्वी भूमी या चित्रपटात शेखर सुमन दिसला होता. फिल्मला फार रिस्पॉन्स मिळाला नाही, मात्र त्याच्या अभिनयाचे कौतूक झाले होते. 
- शेखरने 1984 मध्ये 'उत्सव' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. या फिल्ममध्ये लीड रोलमध्ये रेखा आणि शशि कपूर होते. 
- याशिवाय त्याने 'नाचे मयूरी' (1986), 'अनुभव' (1986), 'संसार' (1987), 'त्रिदेव' (1989), 'प्रोफेसर की पड़ोसन' (1993), 'चोर मचाए शोर' (2002), 'चलो मूवी' (2011) सारख्या अनेक चित्रपटांतून काम केले आहे. शेखर सुमनला त्याच्या चित्रपटातून फार प्रसिद्धी मिळाली नाही, मात्र टीव्ही शोने त्याला ओळख मिळवून दिली होती. त्याचा मुलगा अध्ययन सुमनही बॉलिवूडमध्ये आहे मात्र त्यानेही अद्याप दखलपात्र काम केलेले नाही. 
 
टीव्हीने मिळवून दिली ओळख 
- 'उत्सव' नंतर हा शेखर सुमनचा चित्रपट होता, असे नाव घ्यावे असा त्याचा एकही चित्रपट लक्षात येत नाही. मात्र टीव्ही शो 'मूव्हर्स अँड शेखर्स' या टॉक शोने त्याला ओळख मिळवून दिली होती. 
- यानंतर 'मैं अनाड़ी तू खिलाड़ी', 'हेरा फेरी', 'कभी इधर कभी उधर', 'अंदाज', 'विलायती बाबू', 'एक था राजा एक थी रानी', 'देख भाई देख', 'दम दमा दम' यासारखे त्याचे टीव्ही शो चर्चेत होते. 
- रियालिटी शो 'कॉमेडी सुपरस्टार', 'लाफ इंडिया लाफ', 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये तो जजच्या भूमिकते होता. 
 
पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, शेखर सुमनचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटोज...    
बातम्या आणखी आहेत...