आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची भररसत्यावर कार चालकाला शिविगाळ; व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'अनटोल्ड स्टोरी' सिनेमात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेला सुशांत आता वेगळ्याच विषयावरून चर्चेत आला आहे. सुशांतने भररस्त्यावर कार चालकाला शिविगाळ केली आहे. विशेष म्हणजे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या गोरेगाव येथील ही घटना आहे. सुशांत आपला आगामी सिनेमा 'चंदा मामा दूर'ची शूटींग आटोपून फिल्मसिटीत परत येत होता. तेव्हा फिल्मसिटीपासून काही अंतरावर एका कार चालकाने सुशांतच्या कारला ओव्हटेक करून यू-टर्न घेण्याचा प्रयत्न केला. हेच सुशांतला खटकले. त्याने लगेच गाडीच्या खाली उतरून भररस्त्यावर कार चालकासोबत हुज्जत घातली. सुशांतने कार चालकाला शिविगाळही केली. कार चालकानेही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. दोघांमधील वाद विकोपाला जाऊन दोघे हाणामारीपर्यंत पोहोचले. मात्र, उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून दोघांचे भांडण सोडवले.

या घटनेबाबत सुशांतने अद्याप कोणतीही टिप्पणी दिलेली नाही. सुशांत सध्या त्याचा आगामी सिनेमा 'चंदा मामा दूर' च्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या तयारीसाठी सुशांतने काही दिवस 'नासा'मध्येही ट्रेनिंग घेतली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सुशांतसिंह राजपूतचा भररसत्यावर कार चालकाला शिविगाळ करतानाचा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...