Home »News» Bollywood Actress Aishwarya Rai Bachchan Father Death In Mumbai

अभिनेत्री ऐश्वर्या रायला पितृशोक, कृष्णराज यांनी लीलावतीमध्ये घेतला अखेरचा श्वास

दिव्य मराठी वेब टीम | Mar 18, 2017, 20:22 PM IST

  • अभिनेत्री ऐश्वर्या रायला पितृशोक, कृष्णराज यांनी लीलावतीमध्ये घेतला अखेरचा श्वास
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांचे आज (शनिवारी) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. कृष्णराज राय यांच्यावर मागील काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहिती अशी की, कृष्णराज राय यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जानेवारी महिन्यात लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.

Next Article

Recommended