आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्युड MMS नंतर घर सोडले, धर्म बदलला, लग्न मोडले, वाचा बॉलिवूड अभिनेत्रीची व्यथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बॉलिवूडमधील ग्लॅमरस लाईफ किती फसवी आहे हे या घटनेवरुन उघडकीस आले आहे. अलिसा खान नावाच्या मॉडेल-अभिनेत्रीची लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी कनखल येथील लव कपूरसोबत तिने लग्न केले होते. यासाठी तिने हिंदू धर्म स्विकारला होता. पण लव कपूरने आता तिच्याकडे पाठ फिरवली असून आता तिला आर्थिक समस्यांनी ग्रासले आहे.
लव कपूर आणि अलिसा खान यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लव हिंदू असल्याने अलिसाच्या घरुन याला विरोध होता. त्यामुळे अलिसाने हिंदू धर्म स्विकारला. दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले. पण त्यानंतर लव तिला घरी घेऊन गेला नाही. तिला एक पॉश हॉटेलमध्ये ठेवले. घरी कधी नेणार आहेस याची वारंवार चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. असे दोन महिने गेले. त्यानंतर त्याने अलिसासोबतचे नाते तोडले. कुटुंबीयांनी दबाव आणल्याने त्याने नाते तोडल्याचा आरोप अलिसाने केला आहे.
अलिसा आणि लव कपूर एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटले होते. त्यानंतर दोघे चांगले मित्र झाले. पण भेटीगाठी नव्हत्या. केवळ फोनवर बोलणे व्हायचे. या दरम्यान अलिसाचा न्युड एमएमएस लीक झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढले. तेव्हा लवने तिला आधार दिला. यावेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अलिसा एका श्रीमंत घरची मुलगी आहे. माझ्या संपत्तीसाठी त्याने लग्न केले होते, असा तिचा आरोप आहे. अलिसाजवळचे पैसे संपले आणि तिला संपत्तीत वाटा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर लव कपूरने नाते तोडले. आता तिने हरिद्वार पोलिसांकडे याची तक्रार नोंदवली आहे. मला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेल असा इशारा तिने दिला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अलिशा खानचे ग्लॅमरस फोटो....
बातम्या आणखी आहेत...