आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Athiya Shetty 25th Birthday Have A Look At Her Cute Childhood Photos

B\'day: 25 वर्षांची झाली सुनील शेट्टी लाडकी लेक, बालपणी होता असा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी 25 वर्षांची झाली आहे. 5 नोव्हेंबर 1992 रोजी मुंबईत अभिनेता सुनील शेट्टीच्या घरी अथियाचा जन्म झाला. बॉलिवूड घराण्याशी संबंध असलेल्या अथियाला बालपणापासूनच सिनेमांची आवड आहे. आपल्या आवडीचे प्रोफेशन निवडण्यासाठी अथियाला तिचे वडील सुनील शेट्टी, आई माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनी मदत केली.

बालपणापासूनच अभिनयाची आवड...  
तीन वर्षांची असल्यापासूनच अथियाला अभिनयाची आवड आहे. बालपणी आरशासमोर उभी राहून ती अॅक्टिंग आणि डान्स करायची. शालेय जीवनात असताना ती रंगभूमीवर काम करु लागली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अथियाने अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून 'फिल्मेकिंग अँड लिबरल आर्ट्स' हा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. वयाच्या 18 व्या वर्षी हा कोर्स पूर्ण करुन अथिया मुंबईत परतली. येथे तिने अॅक्टिंग, एडिटिंग आणि डायरेक्शनचे धडे गिरवले.
 
लांबचा पल्ला गाठणार...
एका मुलाखतीत अथियाने सांगितले, मला बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे. अभिनयाविषयी मी खूप इमोशनल आहे. या इंडस्ट्रीत मी लांबचा पल्ला गाठेल, अशी मला आशा आहे.

सोशल नेटवर्किंग साइट्सवर आहे अॅक्टिव...
बॉलिवूडची ही नवोदित अभिनेत्री सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची बरीच छायाचित्रे अपलोड केली आहेत. यामध्ये तिच्या बालपणीच्याही छायाचित्रांचा समावेश आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अथियाची बालपणीची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...