आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशच्या लाडक्या बायकोचा आज Bday, ख्रिश्चन-महाराष्ट्रीयन पद्धतीने अडकले होते लग्नगाठीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुख आज (5 ऑगस्ट) आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 ऑगस्ट 1987 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. बॉलिवूड अभिनेत्री असण्याबरोबरच जेनेलिया एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे. बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा काम केले आहे. जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड सिनेमांमध्ये जेनेलिया झळकली आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे. 
 
3 जानेवारी 2012 रोजी जेनेलिया बॉलिवूड अभिनेता आणि महाराष्ट्राचे मोठे नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखबरोबर विवाहबद्ध झाली. रितेश आणि जेनेलियाचे लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. 

लग्नानंतर एका ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी टाऊनमधील अनेक मंडळी या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आशुतोष गोवारिकर आणि त्यांची पत्नी, सैफ अली खान, करीना कपूर, अमृता राव,  सलमान खानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा, काजोल, अजय देवगण, श्रीदेवी, बोनी कपूर, रेखा, सुश्मिता सेन, जॅकलिन फर्नांडिस, साजिद खान, मलायका अरोरा खानसह बी टाऊनमधील बरेच सेलिब्रिटी या दोघांच्या लग्न आणि रिसेप्शन पार्टीत पोहोचले होते. 

जेनेलिया दोन गोंडस बाळांची आई झाली आहे. रिआन आणि राहिल ही तिच्या लाडक्या मुलांची नावे आहेत. आई झाल्यापासून जेनेलियाने अभिनयापासून थोड्याकाळासाठी ब्रेक घेतला आहे. अधूनमधून ती बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्टीत रितेशसोबत दिसत असते.

जेनेलियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जेनेलिया-रितेशच्या लग्नाचा अल्बम...  
बातम्या आणखी आहेत...