आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचुप थाटले लग्न, जाणून घ्या कुठे झाला विवाहसोहळा?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हृषिता भट हिने वयाच्या 35 व्या वर्षी गुपचुप लग्न थाटले. 4 मार्च रोजी यूनाइटेड नेशनचे सीनिअर डिप्लोमेट आनंद तिवारीसोबत हृषिताने सप्तपदी घेतल्या. दिल्लीत दोघांचे लग्न झाले. सहा महिने डेटिंग केल्यानंतर या जोडीने फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्सच्या उपस्थितीत लग्न थाटले. 

गुपचुप लग्न थाटल्याविषयी काय म्हणाली ही अॅक्ट्रेस....  
एका एन्टरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हृषिता म्हणाली, "आमच्या लग्नात केवळ फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्स सहभागी झाले होते. आम्हाला हा सोहळा अतिशय खासगी ठेवायचा होता. आमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छ आणि आशीर्वाद हवे आहेत." लग्नात हृषिताने रेड कलरचा सुंदर लहेंगा परिधान केला होता.

शाहरुखच्या सिनेमातून केले डेब्यू... 
मुंबईत जन्मलेल्या हृषिताने लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. अनेक जाहिरातींमध्ये ती झळकली आहे. शाहिद कपूरच्या 'आखों में तेरा ही चेहरा' या म्युझिक व्हिडिओत ती झळकली होती. 2001 साली आलेल्या शाहरुख खान स्टारर 'अशोका' या सिनेमाद्वारे हृषिताने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. 'अब तक छप्पन', 'पेज 3', 'शोरगुल', 'जुनूनियत', '30 मिनट्स'  या हिंदी सिनेमांसोबतच मराठी, बंगाली, पंजाबी आणि नेपाली सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, हृषिताच्या लग्नाचे निवडक फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...