ठाणे - ड्रग्ज रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे असून, नव्या पुराव्यांच्या आधारे ममता आरोपी आहे. सध्या ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी केनियामध्ये असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पुराव्यांच्या आधारावर ममता कुलकर्णी आता ड्रग रॅकेट प्रकरणात आरोपी असून, सीबीआयमार्फत ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याची विनंती इंटरपोलला करणार आहोत, असेही ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ड्रग तस्करांच्या बैठकीत ममता कुलकर्णी उपस्थित होती, ममताविरोधात 2 आरोपींची साक्ष, असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
नव्वदच्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अभिनेत्रींमध्ये ममताची गणना केली जायची. 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत जन्मलेली 44 वर्षीय ममताने 'डोंगा पुलिस' या तेलगू सिनेमाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी ममताला 'तिरंगा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. 1993 मध्ये रिलीज झालेला 'आशिक आवारा' हा सिनेमा ममताच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बोल्ट न्यू फेस अवॉर्डसुद्धा मिळाला.
ममताने आपल्या करिअरमध्ये 'भूकंप', 'अशांत', 'विष्णु विजय', 'बाजी', 'सबसे बड़ा खिलाड़ी', 'करण-अर्जुन', 'नसीब', 'चाइना गेट', 'छुपा रुस्तम', 'क्रांतिवीर', 'आंदोलन', 'किस्मत' यांसह अनेक सिनेमात काम केले आहे.
पुढे वाचा, ममता कशी बनली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)