पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सेल्फी विथ डॉटर' आणि योगसक्तीवर
ट्विटरवरून निशाणा साधणाऱ्या अभिनेत्री नेहा धुपिया मोदी समर्थकांच्या टीकेचे लक्ष्य ठरली असून तिच्यावर अश्लील कॉमेंट्सचा भडीमारच करण्यात आला आहे.
मुंबईतील मुसळधार पावसाचे निमित्त करून नेहाने अलीकडेच सरकारवर टीका करणारे ट्विट केले होते. 'पाऊस पडतो आणि संपूर्ण शहरच ठप्प पडते. अशावेळी केवळ सेल्फी आणि योग करण्याचे सल्ले दिले जाऊ नयेत. लोकांच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे. त्यालाच खरे सुशासन म्हणता येईल', असे नेहाने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते. नेहाच्या या ट्विटने सोशल मीडियावर मोठा गदारोळच माजला आहे,
नेहाच्या या ट्विटवर 3 हजार 935 लोकांनी रिट्विट केले तर 3 हजार 449 लोकांनी हे ट्विट फेवरेट ठरवलंय. नेहाच्या ट्विटवर जो रिट्विटचा पाऊस पडलाय त्यात नेहाच्या मताचे समर्थन करणारे लोक कमी आणि नेहावर टीका करणारी मंडळी जास्त आहे. नेहावर अश्लील कॉमेंट करताना ती हे प्रसिद्धीसाठीच करत आहे, अशी तोफ डागण्यात आली आहे. विशेष म्हणजे या 'वॉर'मुळे नेहा ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्येही झळकू लागली आहे.
नेहाच्या ट्विटरवर मोदी समर्थकांनी केलेले काही रिट्विट्स पुढीलप्रमाणे...
>> बेरोजगार सेलिब्रिटीजसाठी लवकरात लवकर 'मनरेगा'सारखी योजना सुरू करायला हवी. 'खाली दिमाग शैतान का घर होता है' - सब्रिना
>> अभिनेत्री म्हणून अपयशी ठरलेली नेहा आता मोदींवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात येतेय: शिवेंद्र केसरी
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, नेहाच्या ट्विटवर लोकांनी केलेले ट्विट...