आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : पंचतारांकित हॉटेलमध्ये BIG BOSS फेम पूजा मिश्रासोबत छेडछाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पूजा मिश्रा)
उदयपूर : प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा मिश्राने तिच्यासोबत छेडछाड झाल्याचा आरोप लावला आहे. 10 एप्रिलपासून पूजा उदयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. बिग बॉसच्या पाचव्या पर्वात झळकलेली पूजा येथे एका कॅलेंडर लाँचच्या निमित्ताने पोहोचली होती. हॉटेलच्या रुममध्ये शिरुन काही अज्ञात लोकांनी आपली छेड काढल्याचा आरोप तिने लावला आहे. यासंदर्भात येथील अंबामाता पोलिस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली आहे.
हे कुणाचे तरी हे कटकारस्थान असून बॉलिवूडमधील मोठ्या लोकांचा यामागे हात असल्याचे तिचे म्हणणे आहे. पूजाच्या तक्रारीनंतर डीएसपी गोपाल सिंह भाटी आपल्या सहका-यांसोबत हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये पोहोचले होते. पोलिसांनी पूजाची वैद्यकीय तपासणी करुन घेतली आहे. शिवाय गेल्या तीन दिवसांत तिच्याशी संपर्कात आलेल्या हॉटेल कर्मचा-यांची चौकशी करत आहेत.
सविस्तर वृत्त असे, की 10 एप्रिलच्या रात्री दोनच्या सुमारास पूजा उदयपूर येथे आली. येथे 14 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता इव्हेंट मॅनेजर आणि काही परिचित लोकांसोबत ती डिनरला गेली. तेथून रात्री बाराच्या सुमारास ती हॉटेलमध्ये परतली आणि चहा घेतला. गाढ झोपेतून उठल्यानंतर आपल्याला कुणीतरी चहा किंवा खाण्यातून गुंगीचे औषध दिल्याचे तिच्या लक्षात आले. रात्री झोपेतच कुणीतरी रात्री आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने म्हटले. यापूर्वी म्हणजे 13 एप्रिल रोजी पूजाने बॅगेतून दागिने चोरीला गेल्याचे म्हटले होते.
बलात्काराची चर्चा...
या घटनेनंतर पूजा मिश्रावर गँगरेप झाल्याची चर्चा होती. मात्र पूजाने याचे खंडन केले असून स्पष्ट केले, की तिच्यासोबत छेडछाड झाली आहे. पूजाने सांगितले, की हॉटेलच्या रुममध्ये अचानक काही अज्ञात लोक नॉक न करता शिरले. त्यांनी तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. पूजाने रुममधील अस्तव्यस्त झालेले सामान आणि चादर पोलिसांना दाखवली. पोलिसांनी रुममधील चादर आणि आणखी काही गोष्टी जप्त केल्या असून पुढील तपास सुरु आहे.
एफआयआर दाखल करुन घेण्यात आली आहे. अनेक गोष्टींत विरोधाभास दिसतोय. चौकशी सुरु आहे. हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा इंकार करता येत नाही. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. - जितेंद्र आंचलिया, इन्स्पेक्टर, अंबामाता
पुढे पाहा, हॉटेलमध्ये पोलिसांसोबत दाखल झालेल्या पूजाची छायाचित्रे...