आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली, अन् सर्वकाही सोडून लंडनला निघून गेली होती ही अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - बुधवारी शहरातील एका हॉटटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अॅक्ट्रेस राधिका आपटेने बॉलीवूडमधील तिचा प्रवास आणि यशाच्या खऱ्या मापदंडाबाबत मते मांडली. थिएटरमधील कामापासून ते परदेशात जाण्याच्या दरम्यान असलेली संभ्रमावस्था आणि पुन्हा भारतात येऊन चित्रपटांत काम मिळण्याचा अनुभव तिने यावेळी सर्वांसमोर मांडला. 

म्हणाली, प्रयोग करून पाहा.. 
- राधिका म्हणाली, मी पुण्याची राहणारी आहे. त्याठिकाणी थिएटर आणि कल्चरल अॅक्टीव्हीटीज मोठ्या प्रमाणात होतात. मी कॉलोजमध्ये असतानाच थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मुंबईतही सर्वात आधी मी थिएटरच केले. 
- मी करिअरबाबत नेहमी संभ्रमात राहिलेली आहे. मला आधी वाटायचे की, मी फक्त थिएटरसाठीच बनलेली आहे. पण त्यानंतर चित्रपटांत संधी मिळाली आणि मी तिकडे वळले. त्यानंतर कथक शिकण्याची इच्छा झाली तर मी सर्वकाही सोडून लंडनला गेले. 
- परत आले तेव्हा मुंबईत जायचे की नाही हा प्रश्न होता. कारण याठिकाणी असलेला प्रत्येक दिवस भयावह असतो. त्यानंतर काही चित्रपटांत ऑडिशन दिले आणि मला संधी मिळाली. माझ्या दृष्टीने पाहिले तर जीवनात कायम प्रयोग करत राहायला पाहिजे. 

राष्ट्रीय पुरस्कार.. 
- 7 सप्टेंबर 1985 ला पुण्यात जन्मलेल्या राधिकाने शहरातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. 
- ती पुण्यातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. चारू आपटे यांची मुलगी आहे. तिचे आई वडील आजही पुण्यातच राहतात. राधिकाही तिच्या सुट्यांमध्ये पुण्यातच अधिक काळ राहत असते. 
- तिला लहानपणापासून अभियनाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना ती पुण्यातील 'आसक्त' या मराठी थिएटर ग्रुपशी संलग्न होती. 
- राधिकाने 'पूर्ण विराम', 'मात्र-रात्र' आणि 'कन्यादान' अशा हिट मराठी नाटकांत महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. बंगाली चित्रपट 'अंतहीन' मधील वृंदा या पात्रासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 

ब्रिटिश बॉयफ्रेंडबरोबर लग्न 
- 'शोर इन द सिटी' चित्रपट रिलीज झाल्यानंतर राधिकाने लंडनमध्ये राहून कंटेम्पररी डान्स शिकला. 
- डान्स शिकण्याच्या दरम्यान तिची ओळख लंडन बेस्ड म्युझिशियन बेनेडिक्ट टेलर बरोबर झाली. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राधिका आपटेचे काही PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...