आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rani Mukherjee Said Children Trafficking Not Less Than Terrorism

INTERVIEW: राणी म्हणते, 'मुलांची तस्करी दहशतवादापेक्षा कमी नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राणी मुखर्जीचा फाइल फोटो)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीच्या अभिनयाने चर्चेत आलेला दिग्दर्शक प्रदीप सरकारचा 'मर्दानी' सिनेमाचा प्रिमिअर पोलांडमध्ये 28 जानेवारी रोजी संध्याकाळी झाला. या प्रिमिअरसाठी राणी मुखर्जी उपस्थित होती. प्रिमिअर पोलांडची राजधानी वॉरसच्या सर्वात जून्या आर्ट हाऊसपैकी एका थिएटरमध्ये झाला. पोलांडमध्ये 'मर्दानी' 5 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. मागील वर्षी भारतात रिलीज झालेला 'मर्दानी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, सोबतच समीक्षकांनी त्याची भरभरून प्रशंसादेखील केली. पोलांडमध्ये झालेल्या प्रिमिअरनंतर तेथील प्रेक्षकांनीसुध्दा सिनेमाची प्रशंसा केली.
राणीने 'मर्दानी' सिनेमात गुन्हेशाखेच्या पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली होती. 'मर्दानी'मध्ये मुलांची तस्करी आणि वेश्यावृत्तीसारख्या मुद्यांवर प्रकाश टाकण्यात आला होता. कदाचित याच कारणामुळे हा सिनेमा पोलांडमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. कारण पोलांडमध्ये मुलांची तस्करी आणि वेश्यावृत्तीसारखे गुन्हे मोठ्या संख्येने घडतात. divyamatahi.comने राणी मुखर्जी पोलांडहून परतल्यानंतर तिच्याशी बातचीत केली...त्याचे काही अंश...
प्रश्न- मुलांच्या तस्करीवर तयार झालेला 'मर्दानी'ला पोलांडमध्ये पोलिश सब-टायटल्ससोबत रिलीज करणे आणि सिनेमातून मिळाली प्रसंशा तुझ्यासाठी आश्चर्यकारक आहे?
उत्तर- भारतीय सिनेमे कशाप्रकारे पुढे जात आहेत, हे पाहून पोलांडचे प्रेक्षक आनंदी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमे चांगले प्रदर्शन करत आहेत. मी या सिनेमातून मिळणा-या प्रशंसाने अजिबात आश्चर्यचकित नाहीये. मला माहित आहे 'मर्दानी' मेनस्ट्रीम सिनेमा नाहीये. मुलांची तस्करी आणि शोषण जागतीक विषय आहे. पोलिश मुलींची मोठ्या संख्येने तस्करी केली जात आहे. त्यामुळेच 90 टक्के पोलिश प्रेक्षकांनी सिनेमाला स्वत:च्या भावनांशी जोडले. सिनेमा योग्य भाषेवर बनलेला असेल तर त्यावर भाषेचे बंधन नसते. पुन्हा एकदा सिध्द झाले, की चांगला सिनेमा आपला प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक शोधतो. पोलिश लोकांना वाटते, की भारतीय सिनेमे म्हणजे, डान्स आणि गाण्यांची मेजवानी आहे. परंतु 'मर्दानी' त्याही पलिकडचा आहे. यामध्ये दमदार आणि जागतीक विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा राणी मुखर्जीने 'मर्दानी'विषयी काय-काय सांगितले...