आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाईत उरकलेल्या लग्नानंंतर पहिल्यांदा बोलली रिया- प्रेग्नंट असल्याच्या चर्चा झडतील हे माहित होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस रिया सेन हिने 16 ऑगस्ट 2017 रोजी लॉंग टाईम बॉयफ्रेंड शिवमसोबत एका खासगी समारंभात गुपचुप लग्न केले. या दरम्यान चर्चा रंगली होती, की रिया लग्नापूर्वीच प्रेग्नंट झाली होती. त्यामुळे तिने घाईत लग्न उरकले. लग्नानंतर तिने पहिल्यांदाच एका आघाडीच्या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यात तिने खासगी आयुष्याशी निगडित बाबींवर चर्चा केली.
 
प्रेग्नंट असल्याच्या चर्चेवर हे म्हणाली रिया...
- रियाने सांगितले, की मला माहिती होते, की घाईघाईत लग्न उरकल्याने मी प्रेग्नंट असल्याची चर्चा केली जाईल. याचा मला अंदाज होता. पण मला याच्यावर काही बोलायचे नाही.
- रिलेशनशिपनंतर एकमेकांवर असलेला विश्वास अधिक पक्का होतो. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्यासाठी जरा वाट बघायला हवी.
- लग्न कोणत्याही गोष्टीची गॅरंटी देत नाही. लग्न केल्यानंंतर सगळे सुव्यवस्थित होईल असे नसते.
- खरे प्रेम, आदर, समजुतदारपणा, खरेपणा आणि दोघांमधील समन्वय याला लग्न म्हणतात. याची खात्री पटल्यावर कोणतेही नाते बराच काळ टिकून राहते.
 
लग्नासाठी बॉयफ्रेंडने असे केले प्रपोज
- रिया सांगते, की एक दिवस माझ्यासाठी खास होता. शिवम सकाळी उठला. मला म्हणाला, चल आपण आताच लग्न करुयात. लग्न करण्याचा निर्णय शिवमचा होता. त्याने फार घाईत निर्णय घेतल्याचे मला वाटले. मी याला आणखी एक्सप्लेन करु शकत नाही.
 
अशी झाली पहिली भेट
- रिया आणि शिवम यांची पहिली भेट फेब्रुवारी महिन्यात झाली होती.
- जुहू येथील हॅरी बारमध्ये दोघे भेटले होते. या भेटीच्या एक दिवस आधीच दोघे दिल्लीहून येथे आले होते.
- यानंतर माझे मित्र माझी गंमत करायचे, की तो मला भेटायला मुंबईत आला आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा रिया सेनचा वेडिंग अल्बम....
बातम्या आणखी आहेत...