आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड अभिनेत्री रिया सेनच्या घराला भीषण आग, मोठा अनर्थ टळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री रिया सेनच्या अंधेरीतील घराला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री दीड वाजेदरम्यान आग लागली. यावेळी रिया आई मुनमुनसोबत घरातच होती. सुदैवाने रियाच्या घरी लागलेली आग आजूबाजूला पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मुंबईतील अंधेरीतील रुइया पार्क बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर रियाचे घर आहे. रिया सेन आई-वडिलांसोबत राहते. रियाच्या खोलीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. नंतर रियासह तिच्या कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत रिया सेनचे घर पूर्णपणे जळून खाक झाले होते.

रियाच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, फर्निचर सर्व जळून खाक झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांची सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो....