आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीला पितृशोक; सुरेंद्र शेट्टी यांनी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी हिचे वडील सुरेंद्र शेट्टी (74) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हार्टअटॅकने सुरेंद्र शेट्टी यांची प्राणज्योत मालवल्याचे सूत्रांनी सांगितले.

पतीच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुनंदा शेट्टी यांची शुद्ध हरपली आहे. शमिता, शिल्पा आणि राज कुंद्रा हॉस्पिटलमध्ये असून त्यांची काळजी घेत आहेत.

सुरेंद्र शेट्टी यांच्या पश्चात पत्नी सुनंदा शेट्‍टी, मुलगी शिल्पा आणि शमिता असे परिवार आहे.
पतीच्या निधनाचे वृत्त ऐकताच सुनंदा शेट्टी यांची शुद्ध हरपली आहे. शमिता, शिल्पा आणि राज कुंद्रा हॉस्पिटलमध्ये असून त्यांची काळजी घेत आहेत.

74 वर्षातही घेत होते स्वत:ची काळजी...
शिल्पाचे वडील सुरेंद्र ‍शेट्टी हे औषधीचे वॉटर प्रूफ कव्हर बनवणार्‍या कंपनीचे मालिक होते. फिटनेस फ्रिक अॅक्ट्रेस शिल्पा गेल्या काही महिन्यांपासून वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेत होती. 'वर्ल्ड हार्ट डे' निमित्त शिल्पाने वडिलांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितले होते की, 74 वर्षाच्या वयातही ते चालत फिरत होते. स्वत:च्या प्रकृतीची स्वत: काळजी घेत होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. पण, काही वर्षांपूर्वी त्यांना लकवा झाला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, शिल्पा शेट्टीचेे वडील सुरेंद्र शेट्टी यांचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...