आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्यामा - Divya Marathi
श्यामा

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचे आज (14 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. आपल्या 35 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1980 साली आलेला 'पायल की झंकार' हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. 1945 साली 'जीनत' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

श्यामा यांचे खरे नाव होते खुर्शीद अख्तर...
श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर होते. पण दिग्दर्शक विजय भट यांनी त्यांना श्यामा हे नाव दिले होते. 1953 साली त्यांनी  सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना फारुख, रोहिन ही दोन मुले आणि शिरीन मिस्त्री ही एक मुलगी आहे. त्यांचे पती फली यांचे 1979 साली निधन झाले होते.

या चित्रपटात केले श्यामा यांनी काम...
श्यामा यांनी 'तराना' (1951), 'चार चांद' (1953), 'आर-पार' (1954), 'शारदा' (19757), 'बरसात की रात' (1960), 'बहूरानी' (1963), 'हनीमून' (1973), 'अजनबी' (1974) सह अनेक गाजलेल्या चित्रपटांत भूमिका वठवल्या होत्या.

पुढील स्लाईड्सवर बघा, श्यामा यांची निवडक छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...