आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा, पंतप्रधान-कलाकारांकडून दिग्गज अभिनेत्याला श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता रितेश देशमुखचे ट्विट. - Divya Marathi
अभिनेता रितेश देशमुखचे ट्विट.
मुंबईः ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज (6 जानेवारी) सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडक कलाकारांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली. ओम पुरींच्या सिनेमांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
अनुपम खेर
ओम पुरींना मी गेल्या 43 वर्षांपासून ओळखतो, ते नेहमी माझ्यासाठी एक महान कलाकार आहेत आणि राहतील. शिवाय त्यांना संपूर्ण जगही एक महान कलाकार म्हणून पाहिल, असं अभिनेते अनुपम खेर म्हणाले.
 
शबाना आझमी 
शबाना आझमी यांनी सांगितले, पुरी यांच्या निधनाने त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. पुरी यांच्या रुपात एक सच्चा मित्र गमावल्याची भावना शबाना आझमी यांनी व्यक्त केली आहे. दोघांनी अनेक चित्रपटातून अभिनय केला होता.

मधुर भंडारकर
ओम पुरी आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नसल्याचे मधुर भांडारकर यांनी म्हटले आहे. सिनेसृष्टीला त्यांचे मोठे योगदान लाभले होते.

डेविड धवन
डेविड धवन यांनी सांगितले की, ओम पुरी यांच्या निधनाने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. 1974 मध्ये दोघे रुममेट असल्याचे धवन यांनी सांगितले.

करण जोहर 
सिनेसृष्टीने एक महान कलाकार गमावला, असे निर्माता करण जोहर म्हणाला. 

माधुरी दीक्षित 
ओम पुरींच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला, त्यांच्यासोबत 'अर्धसत्य' सिनेमासह अनेक सिनेमांत काम केले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत अभिनेत्री माधुरी दीक्षितने ओम पुरींना श्रद्धांजली वाहिली.   
 
या कलाकारांसह बॉलिवूडच्या ब-याच कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून ओम पुरींना श्रद्धांजली वाहिली. काय म्हणालेत कलाकार, वाचा पुढील स्लाईड्सवर... 
बातम्या आणखी आहेत...