आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अतिरेक्यांनो थेट युद्ध करा पाहू कोण जिंकतो', अमरनाथ हल्ल्यावर संतापले बॉलिवूडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 15 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. देशभरात या हल्ल्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ट्विटरवर या हल्ल्याबाबत राग व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रितेश देशमुखने तर, 'थेट युद्ध पुकारा पाहू कोण जिंकतो' असे आव्हान अतिरेक्याना केले आहे. 

शाहरूख, सचिनसह सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
अमरनाथ यात्रेंकरूंवर झालेल्या हल्ल्याने दुःखी झालेल्या अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. शाहरूख खान, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटुंनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. अनुपम खेर यांनीही या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. आता बचावात्मक भूमिका सोजून अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे असल्याचेही अनुपम खेर म्हणाले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, सेलिब्रिटींनी केलेले ट्विट्स..
बातम्या आणखी आहेत...