आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर, सुनील दत्तसह या 21 कलाकारांची शेवटची छायाचित्रे बघून पाणावतील तुमचे डोळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि आयुष्याचा निरोप घेताना सर्वांना रडवून जातात. नेहमी चर्चेत राहणा-या सेलिब्रिटींचा मृत्यू प्रेक्षकांना चटका लावून जातो. असेच एक अभिनेते म्हणजे शशी कपूर. 4 डिसेंबर 2017 रोजी शशी कपूर यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. वयाच्या 79 व्या वर्षी शशी साहेबांची प्राणज्योत मालवली. 5 डिसेंबर रोजी शशी कपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या शशी साहेबांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे 1984 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर शशी कपूर एकटे पडले होते. त्यांनी सिनेसृष्टीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती. या दाम्पत्याला कुणाल, करण आणि संजना ही तीन मुले आहेत.

 

शशी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये कधीही न भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शशी साहेब त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून कायम आपल्यातच राहतील. अंत्यसंस्काराच्या वेळी शशी कपूर यांची शेवटची छायाचित्रे समोर आली होती. सततच्या आजारपणामुळे शशी कपूर यांची प्रकृती ढासळत गेली होती. 


शशी कपूर यांच्यासह विनोद खन्ना, सुनील दत्त, नंदा, साधना, प्राण, राजशे खन्ना, अमरिश पुरी, शम्मी कपूर यांच्यासह अनेक  प्रसिद्ध सेलिब्रिटी आता या जगात नाहीत. मात्र कलाकृतींच्या माध्यमातून ते कायम आपल्यातच राहतील. अशाच काही नावाजलेल्या सेलिब्रिटींची त्यांच्या निधनाच्या काही क्षणानंतर क्लिक झालेली छायाचित्रे येथे तुम्हाला बघता येणार आहेत. ही छायाचित्रे बघून नक्कीच या सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे डाळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, तुमच्या लाडक्या बॉलिवूड सेलिब्रिटींची शेवटची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...