आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकांना अखेरचा निरोप देताना राजीव-ऋषी कपूर यांना अश्रू झाले अनावर, शोकाकूल दिसला रणबीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर 5 डिसेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 4 डिसेंबर रोजी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ आजारानंतर शशी कपूर यांचे निधन झाले होते. शशी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कपूर कुटुंबीय एकत्र आले होते. यावेळी शशी कपूर यांचे पुतणे आणि राज कपूर यांची मुले ऋषी कपूर, राजीव कपूर यांना अश्रू अनावर झाले होते. शोकाकूल वातावरणात कपूर कुटुंबीयांनी शशी यांना अखेरचा निरोप दिला. राजीव आणि ऋषी कपूर यांच्यासह रणबीर कपूर, सैफ अली खान, शशी कपूर यांची तिन्ही मुले करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर, त्यांची नातवंडे यावेळी उपस्थित होते. याशिवाय अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, रंजीत, शाहरुख खान, शक्ती कपूर, राकेश ओमप्रकाश मेहरा, सलीम खान, गुलजार, सुरेश ओबरॉय या कलाकारांनी त्यांच्या आवडत्या कलाकाराला अखेरचा निरोप दिला. 


पाहुयात, संबंधित छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...