IFFI: गॉर्जियस लूकमध्ये / IFFI: गॉर्जियस लूकमध्ये दिसली श्रीदेवीची लेक, शाहरुखसह पोहोचले हे सेलिब्रिटी

IFFI: गॉर्जियस लूकमध्ये दिसली श्रीदेवीची लेक, शाहरुखसह पोहोचले हे सेलिब्रिटी. IFFI: गॉर्जियस लूकमध्ये दिसली श्रीदेवीची लेक, शाहरुखसह पोहोचले हे सेलिब्रिटी.

Nov 21,2017 12:03:00 PM IST

गोव्यामध्ये आयोजित इफ्फी 2017 सोहळ्याला सोमवारपासून सुरूवात झाली. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली. 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियाचे उद्घाटन शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला कतरिना कैफ, शाहिद कपूर, विशाल भारद्वाज आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन शाहरुखच्या हस्ते करण्यात आले तर सांगता सलमान खानच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यात अभिनेता शाहरुख खानने सादरीकरणदेखील केले.

कलाकारांची मांदियाळी...
या सोहळ्याल संगीतकार ए.आर.रहमान, स्मृती ईराणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची विशेष हजेरी राहिली. या कार्यक्रमात अभिनेत्री श्रीदेवी पती बोनी कपूर आणि थोरली मुलगी जान्हवी कपूरसोबत पोहोचली. जान्हवी कपूर यावेळी गॉर्जिअस लूकमध्ये दिसली. तिने ब्लॅक आणि रेड कलरचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. याशिवाय शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर, डायना पेंटी, डायरेक्टर सुभाष घई, नाना पाटेकर, राजकुमार राव, राधिका आपटे, जॅकी श्रॉफ सहि अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.


पुढील स्लाईड्सवर बघा, सोहळ्याची खास क्षणचित्रे...

X