मुंबई - नव्या वर्षाच्या म्हणजे 2017 च्या पहिल्या अवॉर्ड नाइटची सुरुवात 62व्या जिओ फिल्मफेयर अवॉर्डने होणार आहे. मुंबईत 14 जानेवारीला वरळी भागात या अवॉर्ड नाइटचे आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वी सोमवारी प्री-अवॉर्ड नाइटचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. शाहरुख खान, करण जोहर, आलिया भट्ट, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, रवीना टंडन आणि टिस्का चोप्रासह अनेक स्टार्सची उपस्थिती होती.
करण जोहर आणि शाहरूख खान हा शो होस्ट करणार आहेत. प्री-अवॉर्ड नाइटमध्ये शाहरूख ब्लॅक ड्रेसमध्ये पोहोचला तर आलिया भट्ट क्रॉप टॉप, हॉट पँट आणि जॅकेटमध्ये झळकली. त्याशिवाय सोनाक्षी सिन्हा ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊन आणि सोनम कपूर पफ शोल्डरच्या गाऊनमध्ये होती. रवीनाने ब्लू-ग्रे गाऊन परिधान केला होता. टिस्का चोप्रा डिझायनर नचिकेत बर्वेच्या ड्रेसमध्ये झळकली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फिल्मफेअर प्री-अवॉर्ड नाइट्स मधील इतर काही Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)