(कुआलालंपूरच्या पवेलियन मॉलमध्ये फॅन्ससोबत हृतिक रोशन, एका इवेंटमध्ये बिपाशा बसू)
मुंबईः इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (IIFA) अवॉर्डसची धूम 5 ते 7 जून दरम्यान चालणार आहे. मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथे या अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडकर कुआलालंपूर येथे दाखल झाले आहेत.
गुरुवारी अभिनेता हृतिक रोशन कुआलालंपूर येथील पवेलियन मॉलमध्ये दिसला. येथे त्याने आपल्या चाहत्यांची भेट घेतली, शिवाय त्यांचे मनोरंजन करण्यासाठी डान्ससुद्धा केला.
हृतिकशिवाय अभिनेत्री बिपाशा बसू, आयुष्मान खुराणा, अर्जुन कपूर, लॉरेन गॉएलिएब, जॅकलिन फर्नांडिस, श्रिया सरन आणि संगीतकार एहसान मोरानीसह बरेच सेलेब्स कुआलालंपूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कुआलालंपूर येथे दाखल झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...