आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रात्रभर कलाकारांनी घेतली सलमानची भेट, आमिर, राणी, प्रितीसह दिसले अनेक सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राणी मुखर्जी, सलमान खान आणि प्रिती झिंटा)
मुंबई- 13 वर्षे जूने हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला 5 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. बुधवारी (6 मे) सलमान शिक्षा सुनावल्यानंतर बॉलिवूडला मोठा धक्काच बसला. बुधवारीच सलमानला हायकोर्टाने दोन दिवसांचा अंतरिम जामीन दिला आहे. सलमान संध्याकाळी घरी पोहोचताच त्याला भेटण्यासाठी गर्दी झाली होती. बॉलिवूडच्या अनेक कलारांनी त्याची रात्रा उशीरापर्यंत भेट घेतली.
राणी मुखर्जी, प्रिती झिंटा, प्रेम चोप्रा, रितेश सिधवानी, सोनू सुद, रमेश तौराणी, करिश्मा कपूर, सुनील शेट्टी, चंकी पांडे, बिपाशा बसु, शायना एनसी, बाबा सिद्दीकी आणि संतोष शुक्लासह अनेक सेलेब्स सलमानला भेटण्यासाठी त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले होते.
2002मध्ये सलमानने एसयूव्ही फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना आपल्या कारने चिरडले होते. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर गंभीर जमखी झाले होते. मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (6 मे) या प्रकरणात सलमानला दोषी ठरवून त्याला पाच वर्षांचा कारावास सुनावला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणते स्टार्स पोहोचले सलमानच्या घरी...