आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमासोबत आजही आहे सनी-बॉबीचा दुरावा, जाणून घ्या सावत्र आईसोबत कसे आहे Starsचे नाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सनी देओल आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. सनी देओल आणि बॉबी देओल, धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची मुले आहेत. हेमामालिनीसोबत धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटला. त्यांनादेखील ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत.
वडिलांच्या दुस-या लग्नाने नाखुश होता सनी...
खरं तर धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांच्या विरोधाला झुगारुन हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले होते. हेमा यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, तर मुलगा सनी देओल सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता. सनी आपल्या वडिलांच्या या निर्णयामुळे नाखुश होता. प्रेम आणि कुटुंब यांच्यात समतोल साधत धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन हेमामालिनी यांच्यासोबत लग्न केले. त्यामुळे सनी देओल आणि बॉबी देओल यांचे सावत्र आई हेमामालिनीसोबत खूप चांगले संबंध नाहीत. शिवाय सावत्र बहिणी ईशा आणि अहाना यांच्यासोबतही त्यांनी नाते ठेवलेले नाही. सनी आणि बॉबी आपल्या दोन्ही सावत्र बहिणींच्या लग्नात सहभागी झाले नव्हते. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हे दोघे सावत्र आई आणि बहिणींविषयी बोलणे टाळत असतात.
सनी आणि बॉबीच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये आणखी काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा स्वीकार केलेला नाही. तर काहींनी सहज आपल्या सावत्र आईला स्वीकारले.

एक नजर टाकुया अशाच काही नातेसंबंधांवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...