आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशा बसूचा पहिला करवा चौथ, मान्यता दत्तसह या सेलेब्सने शेअर केले सेलिब्रेशनचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मु्ंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसूने बुधवारी तिचा पहिला करवा चौथ साजरा केला. या सेलिब्रेशनची खास छायाचित्रे बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. याचवर्षी बिपाशा अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. लग्नानंतरचा हा तिचा पहिला करवा चौथ होता.
अभिनेता अनिल कपूरच्या घरी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी हा सण साजरा करायला एकत्र जमले होते. श्रीदेवी, महिप कपूर, शबाना आझमी, जावेद अख्तर, पद्मिनी कोल्हापुरे, प्रदीप शर्मा, अनुपम खेर, नीलम कोठारी, संजय कपूर, अनेक सेलिब्रिटी करवा चौथचे सेलिब्रेशन केले. गायिका तुलसी कुमार हिनेसुद्धा सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.
तुरुंगातून याचवर्षी बाहेर पडलेला अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यतासाठीसुद्धा यंदाचा करवा चौथ स्पेशल होता. तिने संजयसोबतचा एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.
पुढील स्लाईड्समध्ये बघा बिपाशासोबतच बी टाऊन सेलिब्रिटींनी शेअर केलेले करवा चौथ सेलिब्रेशनचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...