Home »News» Bollywood Celebs View On Childrens Day

सलमान पासून दीपिकापर्यंत बालपणी असे दिसत होते सेलेब्स, शेअर केले लहानपणाचे किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 00:05 AM IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरुंची (चाचा नेहरु) आज (14 नोव्हेंबर) जयंती आहे. संपूर्ण देशात आजचा दिवस 'बाल दिन' म्हणून साजरा होता. पंडित नेहरुंना मुले खूप आवडत होती, आणि मुलेही देशाच्या या पहिल्या पंतप्रधानांना चाचा नेहरु म्हणत होते. बालपण हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे असते. आपल्या प्रत्येकांच्या बालपणीच्या काही आठवणी असतात. DivyaMarathi.Com सेलेब्ससोबत खास बातचीत करुन त्यांच्या लहानपणाचे किस्से खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे...
सलमान खान
आम्ही सर्व भावंडं लहानपणापासून खोडकर आहोत. आमच्या खोड्यांमुळे वडिलांना खूप त्रास व्हायचा. आम्ही त्यांच्या नाकात दम आणून सोडायचो. मात्र जेव्हा पकडले गेलो तेव्हा सर्वाधिक रट्टा मलाच खावा लागत होता. अरबाज पळून जात होता आणि सोहेल छोटा असल्यामुळे तो वाचायचा. एकदा तर आम्ही हद्दच केली होती. मजे मजेत आम्ही घरातील, छतावरील जुणी भांडी आणि त्यासोबत काही ट्रॉफी विकायला निघालो होतो. पण पापाने पकडले आणि आमची खूप धुलाई झाली होती. आजही मुलांना पाहिल्यानंतर 'दिल बच्चा हो जाता है'...
पुढील स्लाइडमध्ये शाहरुख, दीपिका, श्रद्धा कपूर, अक्षय कुमारच्या बालपणीच्या आठवणी...

Next Article

Recommended