आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या घरी विराजमान झाले गणेशजी, रितेश-जेनेलिया, मलायकासह सेलेब्सने केले Welcome

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सोमवारी अभिनेता सलमान खानची आई सुशीला चरक यांनी आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटस्थित घरी गणेशची विधीवत पूजाअर्चा केली. यावेळी बाप्पाचे दर्शन घ्यायला अभिनेत्री मलायका अरोरा खान तिची बहीण अमृता अरोरासोबत गॅलेक्सीमध्ये पोहचली. विशेष म्हणजे मलायका आणि अरबाज खान विभक्त झाल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच मलायका आपल्या सासरी पोहोचली होती. मलायका आणि अमृता अरोरा यांच्याशिवाय दीया मिर्झा आणि तिचा नवरा साहिल संघा, रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया, दिव्या कुमार खोसला, करिश्मा कपूर, दलीप ताहिलसह अनेक सेलिब्रिटी सलमानच्या बापाच्या दर्शनाला पोहोचले.
सध्या शिमल्यात आहे सलमान...
सलमान खान गणपतीच्या स्वागतासाठी यंदा मुंबईत नव्हता. सध्या तो शिमल्यात त्याच्या आगामी ट्युबलाइट या सिनेमाचे शूटिंग करतोय. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमानसोबत चायनीज अॅक्ट्रेस जूजू झळकणारेय. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा सलमानच्या घरी झालेल्या गणपती स्थापनेचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...