आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा प्रकारे सुरु आहे येथे फिल्मची शूटिंग, पाहा Behind The Scene

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड फिल्म भू-माफियाची शूटिंग बुलंदशहर येथे झाली. - Divya Marathi
बॉलिवूड फिल्म भू-माफियाची शूटिंग बुलंदशहर येथे झाली.

मुंबई/झांसी - अपकमिंग बॉलिवूड फिल्म भू-माफियाची 80 टक्के शूटिंग बुंदेलखंड आणि लखनऊ येथे झाली आहे. उर्वरित शूटिंग अलाहाबाद येथे होणार आहे. या फिल्ममधील व्हिलनच्या छोट्या भावाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त बुधौलियाने DivyaMarathi.com सोबत आपल्या फिल्मी लाइफ आणि चित्रपटाबद्दल दिलखुलास बातचीत केली. 

 

अॅक्टिंगच्या वेडाने झपाटले होते, तीन वेळा घरातून पळून गेलो

- देवदत्तने सांगितले, की बालपणापासून त्याला अॅक्टिंगची आवड होती. मात्र हे त्याच्या कुटुंबियांना आवडत नव्हते. अॅक्टिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवदत्त 20 वर्षांचा होता तेव्हा घरातून पळून मुंबईला गेला होता. 10 दिवस इकडे-तिकडे भटकल्यानंतर हातात काहीच आले नाही तेव्हा तो घरी परत आला होता. 

- घरी आल्यानंतर घरच्यांनी बेदम चोप दिला, असे केल्यानंतर तरी याचा अॅक्टिंगचा छंद, बंद होईल अशी त्यांची धारणा होती. अशीच काही वर्षे गेली, मनात अॅक्टर होण्याचे स्वप्न अजूनही घर करून होते. ते सतत बेचैन करत राहायचे. म्हणून पुन्हा एकदा मुंबईचा मार्ग पकडला आणि परत गावी आलो. 


- देवदत्तने सांगितल्यानुसार, त्याने तिसऱ्यांदा मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने ठरवले होते की काही झाले तरी घरी परत जायचे नाही. मुंबईत फुटपाथवर राहिला. वडापाव खाऊन दिवस काढले. अखेर एका टीव्ही सीरियलमध्ये देवदत्तला रोल मिळाला. ती सीरियल होती  'राजा की आएगी बारात'. रोल मोठा नव्हता परंतू रोल होता हे महत्त्वाचे, देवदत्त सांगत होता. 

 

बजरंगी भाईजानमध्ये रोल ऑफर झाला होता... 
- 8 ऑगस्ट 1975 ला जन्मलेल्या देवदत्तने अनेक बॉलिवूड फिल्ममध्ये काम केले आहे. त्याने अभिषेक बच्चनच्या 'रावण' मध्ये छोटी भूमिका केली होती. 
- 'बजरंगी भाईजान'मध्ये पाकिस्तानी पोलिसाच्या भूमिकेची ऑफर होती, मात्र त्याचवेळी दुसरीकडे शूटिंग सुरु असल्याने ही संधी हातातून गेल्याचे देवदत्तने सांगितले. 

 

बुंदेली फिल्ममध्ये केले काम 
- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध सीरियल 'चिडाय घर'मध्ये माफिया डॉन, 'नाना नारंगी'मध्ये पाणी का बेताज बादशाह, 'पीटरसन हिल', 'इश्क का रंग सफेद', 'उतरन', स्टार प्लसवरील  'तेरे शहर में', सब टीव्हीवरील 'यहां हैं हम', लाइफ ओके वरील 'सावधान इंडिया', 'महादेव', 'जिन्दगी विन्स', 'सिंघासन बत्तीसी'  सारख्या 50 सीरियल्समध्ये देवदत्तने अॅक्टिंग केली आहे. 
- याशिवाय बुंदेली फिल्मध्ये देवदत्तने काम केले आहे. सध्या त्याच्याकडे बॉलिवूडच्या 5 फिल्म आहेत. लवकरच त्याची भू-माफिया आणि भाईजान ही फिल्म रिलीज होणार आहे. 

 

इरफान खानची पत्नी आहे निर्माती 
- देवदत्तने सांगितले, की बॉलिवूड अॅक्टर इरफान खान यांची पत्नी सुतापा सिकंदर 'जिंदगी एक नशा' फिल्मची निर्मिती करत आहेत. या फिल्मध्ये देवदत्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील विनीत सिंह, मनोज बख्शी, विपिन शर्मा आहेत. 
- याशिवाय देवदत्तने 'पीपली लाइव' फेम रघुवीर यादवची फिल्म 'तिल्ली'मध्येही काम केले आहे. 
- देवदत्त म्हणाला, माझ्या पर्सनॅलिटीमुळे मला नेहमी पोलिस किंवा माफिया डॉनचे रोल मिळतात. 

 

अशी आहे भू-माफिया 
- 'भू-माफिया'मध्ये व्हिलन पैशांच्या जोरावर भूखंड, घरे यांच्यावर कब्जा करतो. अवैध खाण उद्योग सुरु करतो. या कामांमध्ये त्याला एक वकील मदत करत असतो नंतर तोच त्याच्याविरोधात जातो. 
- फिल्मध्ये कायदा आणि भू-माफिया यांच्यातील युद्ध दाखवण्यात आले आहे. यात एक वकील हिरो म्हणून पुढे येतो. 
- फिल्मचा डायरेक्टर संजय श्रीवास्तव म्हणाला, यूपीमध्ये भू-माफियांचा मुद्दा गाजत आहे. यालाच केंद्रस्थानी ठेवून फिल्म तयार केली आहे. 

 

हे आहेत कलाकार
फिल्मध्ये आर्यन वैद्य, सुरेंद्र पाल, अनिल यादव, आरके यादव, प्रिया वर्मा, मनोज बख्शी, सीमा सिंह, देवदत्त बुधौलिया सारखे कलाकार आहेत. 
- भू-माफियाची भूमिका आर्यन वैद्य साकारत आहे. सुरेंद्र पाल त्याच्या वडिलांच्या भूमकिते आहे. 
- नायकाच्या भूमिकेत आरके यादव आहे. तो फिल्मध्ये वकील असतो. फिल्मची नायिका प्रिया वर्मा दिल्लीची मॉडेल आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भू-माफियाचे  Behind The Scene

बातम्या आणखी आहेत...