आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Has Lost A Talented Actor Ashraful Haque.

अभिनेता अशरफ उल हकचे निधन, \'फुकरे\', \'कंपनी\'मधून मिळाली होती ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अशरफुल हक)
मुंबई- वेगळ्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये ठसा उमटवणारा अभिनेता अशरफ उल हक (वय ४५) याचे मंगळवारी निधन झाले. बोन मॅरोशी संबंधीत असाध्य रोगाने त्याला ग्रासले होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्याच्यावर अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

मुळच्या आसाममधील गोलपारा या छोट्याशा गावातून आलेल्या अशरफने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवीचे शिक्षण घेतले. कंपनी, जंगल, सतरंगी पॅराशूट, रावण, दीवार, ब्लॅक फ्रायडे आदी चित्रपटांत त्याने अभिनय केला होता. ‘फुक्रे’ या चित्रपटात त्याने साकारलेली एका दारुड्याची भूमिका खूपच गाजली होती.
अभिनेता जगदीप अहलावतने सांगितले, की अशरफला बोन मॅरो कॅन्सर होता. अलीकडेच त्याची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्याला व्हँटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु त्याला वाचवण्यात यश आले नाही. अशरफ पत्नी आणि दोन मुलांपासून वेगळे राहत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशरफ उल हकचे फोटो...