आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​अभिनेत्री आलिया भट ही झाली इन्व्हेस्टर!, जाणून घ्या कुठे केली आहे गुंतवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनय सृष्टीतील प्रत्येक कलाकार आज कोणत्या ना कोणत्या बाबींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असताना दिसत आहे. मग यामध्ये यंग जनरेशन तरी का मागे राहतील ? 'स्टुडंट ऑफ दि इयर' पासून ते 'डियर जिंदगी'पर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री आलिया भटसुद्धा सध्या गुंतवणुकीमध्ये लक्ष देत आहे.

 

दिनमान शाह आणि अर्चना वालावलकर यांच्या स्टाईलक्रॅकर या स्टार्टअप कंपनी मध्ये तिने सध्या इन्व्हेस्ट केलेले आहे. आपल्या भविष्याचा विचार करत असता अनेक कलाकार योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. आलियाची केशभूषाकार अर्चना वालावलकरची ही कंपनी असल्यामुळे तिने अगदी आनंदात गुंतवणूक केली असून आलियाने या कंपनीमध्ये किती शेयर इन्व्हेस्ट केलेले आहेत याची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवलेली आहे. स्टाईल क्रॅकर मध्ये व्होग कंपनीचा सुद्धा  ६५ टक्के वाटा आहे .

बातम्या आणखी आहेत...