आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्रने इंडस्ट्रीला म्हटले भाजी मंडी, म्हणाले- पैसे मिळाले तर काहीही करण्यास तयार असतात स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र. - Divya Marathi
धर्मेंद्र.

अभिनेता धर्मेंद्र यांनी सध्याचे बॉलिवूड म्हणजे भाजीमंडी झाल्याची टीका केली आहे. पैशांसाठी स्टार्स काहीही करण्यास तयार असतात, असे म्हणत धर्मेंद्र म्हणाले, आमच्या काळातील इंडस्ट्री आता राहिलेली नाही. ती खूप बदलली आहे. एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद यांनी हे आरोप केले आहेत. धर्मेंद्र यांचा 'यमला पगला दिवना 3' नवीन वर्षात रिलीज होत आहे. 

धर्मेंद्र म्हणाले- तो काळ आता राहिला नाही... 
धर्मेंद्र हे एकेकाळचे स्टार होते. आज इंडस्ट्रीमध्ये जे काही सुरु आहे त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका मुलाखतीत धर्मेंद्र म्हणाले, आमच्या काळातील इंडस्ट्री आता राहिलेली नाही. त्यांनी आजच्या इंडस्ट्रीला भाजीमंडी म्हटले. ते म्हणाले, आज येथे भाजीपाला खरेदी करावे तसे व्यवहार होतात, आणि सौदेबाजीही मोठ्या प्रमाणात होते. 
- अनेक स्टार्स हे आज पैशांसाठी कुठेही नाचण्यास तयार असतात. पैसे मिळणार असतील तर ते कुठेही जाऊन गाणे गाण्यास तयार असतात. एवढेच नाही तर तेल मालिशही करुन देतील, फक्त पैसे मिळाले पाहिजे. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, अवॉर्डबद्दल काय म्हणाले धर्मेंद्र...

बातम्या आणखी आहेत...