चित्रपटाच्या प्रचारादरम्यान दीपिका-कतरिना यांच्यासारख्या अभिनेत्रींवर आयोजक-निर्मात्यांना दररोज २.५ लाख रुपये खर्च करावे लागतात...
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफच्या लाल केसांच्या किमतीने (कथितरीत्या ५५ लाख रुपये) सर्वांना आश्चर्यचकित केले होते. प्रत्येक वेळा ती टीव्हीवर कुठेही दिसते, तेव्हा ती एक दिवसांचा मेकअप, हेयर, ड्रायव्हर आणि स्पॉटबॉय यांचे १.५ लाख रुपये घेते. कोणत्याही टीव्ही शोला गेली असता तिचा हा खर्च चॅनेलला करावा लागतो. दीपिका पदुकोनही एवढेच पैसे घेते. या अभिनेत्रींच्या स्टाफशिवाय स्टायलिस्टच्या एका शिफ्टचा खर्चही एक लाखापर्यंत येतो. तो त्यांच्या ड्रेसची व्यवस्था करून देतो आणि नेसवतोदेखील. नंतर हा ड्रेस संबंधित डिझायनर्सना परत केला जातो.
पुढे वाचा, दिग्दर्शन कोण करणार? यावर अडकला 'आशिकी ३'