आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी टाऊनमधील अनेक स्टार्स आहेत नातेवाईक, जाणून घ्या कुणाचे कुणासोबत आहे कोणते नाते?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहे. कुणाचे मैत्रीचे संबंध आहेत. काहींचे नाते प्रेमाचे आहे, तर काहींमध्ये शत्रुत्व आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. या नात्यांविषयीत्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक नाहीये. अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताचे लग्न बिझनेसमन निखिल नंदासोबत झाले आहे. निखिल राज कपूर यांची मुलगी ऋतु नंदा यांचा मुलगा आहे. याचप्रकारे अभिनेत्री काजोल दिवंगत अभिनेत्री नूतनची भाची आहे. काजेल अभिनेता मोहनीश बहलची बहीण आहे. मोहनीश बहल नूतनचा मुलगा आहे. नूतन आणि काजोलची आई तनुजा सख्या बहिणी होत्या. याशिवाय काजोल आणि राणी मुखर्जी चुलत बहिणी आहेत.

संजय दत्तची बहीण नम्रता दत्त ज्युबली स्टार राजेंद्र कुमार यांची सून आणि कुमार गौरवची पत्नी आहे. यश चोप्रा करण जोहरचे मामा आहेत. करण जोहरच्या आई हीरु जोहर या यश चोप्रांच्या धाकट्या भगिनी आहेत. याचा अर्थ म्हणजे आदित्य चोप्रा आणि करण जोहर भाऊ असून आदित्यची पत्नी राणी मुखर्जी करण जोहरची वहिनी आहे. अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचे कुणाशी कोणते तरी नातेसंबंध नक्की आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बी टाऊनमधील अशाच आणखी काही नातेसंबंधांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...