आपल्या प्रेरक जीवनातून देशातील तरुणाईच्या स्वप्नांना उमेदीचे 'अग्नीपंख' जोडणारे भारताचे 'मिसाइल मॅन', प्रख्यात अणुशास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी (27 जुलै) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शिलाँग येथील रुग्णालयात वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलाम यांच्या निधनाने देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक तसंच सांस्कृतिक जीवनाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, महेश भट, सोनाक्षी सिन्हा, दीया मिर्झा, अजय देवगण, वरुण धवन, सुधीर मिश्रा, श्रीदेवी यांच्यासह अनेक कलाकारांनी विज्ञानाची कास धरणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली आहे.
लता दीदींनी म्हटले, "डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मी खूप दुःखी झाले आहे. मी त्यांना खूप जवळून ओळखत होती. ते खऊप मोठे शास्त्रज्ञ तर होतेच, मात्र त्यासोबतच ते खूप चांगले व्यक्ती आणि कवी होते. मी त्यांना श्रद्धांजली वाहते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो."
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, शोकाकूल बॉलिवूड सेलिब्रिटींनी काय म्हटले...